ब्लॅक ड्रॅगन तायक्वांदो मार्शल आर्ट स्पोर्ट्स अकॅडमी महाराष्ट्र राज्य आयोजित आजी-माजी विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न.
वाई l प्रतिनिधी :
ब्लॅक ड्रॅगन तायक्वांदो मार्शल आर्ट स्पोर्ट्स अकॅडमी महाराष्ट्र राज्य यांचा आजी-माजी विद्यार्थी गुणगौरव सोहळा ब्लॅक ड्रॅगन अकॅडमी चे संस्थापक/अध्यक्ष – विशाल कुमठे, खजिनदार- ओमकार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी
सत्यवती जोशी सभागृह, कन्या शाळा वाई येथे मोठ्या उत्साहात, आनंदी वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा .डॉ.चंद्रकांत कांबळे*
( किसनवीर महाविद्यालय वाई मराठी विभाग प्रमुख ,सांस्कृतिक कला विभाग उपप्राचार्य )व डॉ. तेजस्विनी भिलारे ( संचालिका हिलरेंज हायस्कूल भिलार ) हे लाभले. तर प्रमुख उपस्थिती जतीन भिलारे (प्राचार्य,हिलरेंज हायस्कूल भिलार ) प्रा. शिवाजी शिंदे( संस्थापक, ब्लॉसम चिल्ड्रन्स अकॅडमी वाई )सौ. वैशाली भिलारे( सातारा जिल्हा सरचिटणीस भाजपा ) या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक आणि गुणगौरव करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
वाई, पुणे, सातारा, महाबळेश्वर, भोर येथे सरांचे काम इमाने इतबारे चालू आहे. या संस्थेत खेळाबरोबर संस्कार सुद्धा जपले जातात असे गौरवोद्गार डॉक्टर तेजस्विनी भिलारे यांनी काढले तर प्राध्यापक कांबळे यांनी सांगितले या संस्थेशी पहिल्या दिवसापासून मी संलग्न आहे, कुमठे सर व त्यांच्या सहकार्यांनी मोठ्या मेहनतीने छोट्याशा रोपाचा वटवृक्ष तयार केला आहे. यामुळेच या संस्थेचे खेळाडू राज्य पातळीपर्यंत पोहोचू शकले आहेत.
वैशाली भिलारे यांनी आजच्या युवतींना स्वसंरक्षणाची गरज आहे व या संस्थेत यासाठी अनेक विद्यार्थिनी घडवल्या जात आहेत असे सांगितले तर शिवाजी शिंदे यांनी विशाल कुमठे सर व त्यांची टीम कशा पद्धतीने विद्यार्थी घडवत आहेत याविषयी माहिती सांगितली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष असं सहकार्य पालकांची सुवर्णाताई रांजणे व पालकांचे लाभले.त्यांनी कार्यक्रमासाठी खूप लाख मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेया दाभाडे आणि धीरज गायकवाड यांनी केले तर मयुरेश सूर्यवंशी, रोहन देशपांडे, श्रीधर कदम, विष्णू खोत, वेदांत जैन या सर्व सहकारी व विद्यार्थी पालक मित्र यांच्यामुळे कार्यक्रम यशस्वी पडला.













