भुईंजचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीचा शुक्रवार दि. २३ ऑगस्ट रोजी भंडारा
पाचवड l प्रतिनिधी: भुईंज ता.वाई येथील हजारो भाविकांचे भक्तिस्थान, श्रध्दास्थान, असलेले श्री महालक्ष्मी देवी मंदिर येथे दि. २३ ऑगस्ट रोजी शुक्रवारी श्रावणी भंडारा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्ताने पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे चारपासून श्री महालक्ष्मी मातेस दुग्धाभिषेक, होम हवन, श्री सत्यनारायण महापूजा, आरती, स्वामी समर्थ केंद्र भुईंज तर्फे दुर्गा सप्तशती पठन, सुश्राव्य भजन, भक्तीसंगम कार्यक्रम, किडगावं मंडळांचा भजन सोहळा इत्यादी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
त्यानंतर सकाळी १२ पासून पुढे महाप्रसादाचे आयोजन केले आहे. संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये भक्तिगीतांचा कार्यक्रम होणार आहे. श्री महालक्ष्मी भंडारा उत्सव कमिटी,श्री महालक्ष्मी देवस्थान ट्रस्ट,व सर्व गणेशोत्सव मंडळे, सामाजिक संस्था, मोठ्या उत्साहाने हा सोहळा पार पाडतात. सर्व भाविक भक्तांनी या सोहळ्याचा व भंडाऱ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री महालक्ष्मी देवस्थान ट्रस्ट, महालक्ष्मी भंडारा उत्सव कमिटी व भुईंज ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.













