डी.जी. मध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेतील नोकर भरतीबाबत एकदिवसीय मोफत कार्यशाळा
![]()
दिनांक २३ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता मोफत एकदिवशीय कार्यशाळा आयोजित
भुईंज : महेंद्रआबा जाधवराव
सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा या महाविद्यालयात सन २०१३ पासून बँकिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र कार्यरत असून या केंद्राद्वारे विविध प्रकारच्या बँकिंग स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन वर्ग चालवले जात आहेत.
सध्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या बँकेने २६३ बँक क्लर्क व ६० शिपाई या पदासाठी नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली असून ही सर्व पदे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरती केली जाणार असून जे उमेदवार या बँकेतील पदासाठी इच्छुक आहेत अशा उमेदवारांची गणितीय अभियोग्यता, बुद्धिमापन चाचणी, बँकिंग, सहकार, अर्थशास्त्र, मराठी, इंग्रजी, संगणक व माहिती तंत्रज्ञान या विषयावर आधारित ऑनलाइन परीक्षा होणार आहे.
या भरती परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी युवक युवतींना अचूक मार्गदर्शनाची आवश्यकता असून हे मार्गदर्शन करण्यासाठी धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयातील बँकिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राद्वारे भरती परीक्षेबाबत दिनांक २३ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता मोफत एकदिवशीय कार्यशाळा आयोजित केलेली असून, सदर कार्यशाळा सर्व इच्छुक युवक युवतींसाठी खुली आहे.
इच्छुक युवक युवतींनी या मोफत कार्यशाळेसाठी नावनोंदणी करून कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन केंद्राचे संचालक प्रा. डॉ. विजय कुंभार व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. विठ्ठल सावंत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ८८८८७८०५५४ वर संपर्क साधावा.













