Tue, Mar 3, 2026
सातारा जिल्हा

सुहास भोसले जिल्हास्तरीय आदर्श पोलीस पाटील पुरस्काराने सन्मानित

सुहास भोसले जिल्हास्तरीय आदर्श पोलीस पाटील पुरस्काराने सन्मानित
Ashok Ithape
  • PublishedAugust 20, 2024

भुईंज : महेंद्रआबा जाधवराव

महसूल व पोलीस प्रशासनातील आदर्श कामगिरीसाठी दिला जाणार यावर्षीचा जिल्हास्तरीय आदर्श पोलीस पाटील पुरस्कार खर्शी तर्फ कुडाळ गावचे पोलीस पाटील सुहास भोसले यांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

राज्य शासनाच्या वतीने महसूल व पोलीस प्रशासनात उठावदार व आदर्श काम केलेल्या पोलीस पाटलांचा गौरव केला जातो. यावर्षी सातारा जिल्ह्यातून सुहास भोसले यांना हा सन्मान मिळाला. स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

सुहास भोसले यांनी महसूल, पोलीस प्रशासन व सामाजिक क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केली आहे. त्याची दखल घेऊन या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली. सुहास भोसले यांनी पोलिस पाटील म्हणून संपूर्ण जिल्ह्यात वेगळा ठसा उमटवला आहे. जावली तालुक्यात त्यांनी महिगाव, दुदुस्करवाडी, नरफदेव (मेरुलिंग) या गावांचा चार्ज उत्कृष्टरित्या सांभाळला. कोरोना योद्धा म्हणून त्यांनी केलेले काम पोलिस पाटील यांच्यासाठी प्रेरणादायी ठरले आहे. पोलिस व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करण्याची त्यांची हातोटी त्यांना पुरस्कार देऊन गेली. खर्शी तर्फ कुडाळ गावांत पोलिस पाटील म्हणून काम करताना त्यांनी कायदा सुव्यवस्था राखण्याबरोबरच गावच्या व सायगाव विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी मोठे योगदान दिले आहे.

या पुरस्काराबद्दल त्यांचे आमदार श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले उपजिल्हा अधिकारी नागेश पाटील,सातारा प्रांत सुधाकर भोसले,जावली तहसिलदार हणमंत कोळेकर ,स.पो.नि पृथ्वीराज ताटे, नायब तहसिलदार सुनिल मुनाळे,जावळी गट विकास अधिकारी मनोज भोसले, नायब तहसिलदार संजय बैलकर,शोभा भालेकर,तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रशांत गुजर,सचिव धनाजी गोरे, व सर्व पत्रकार सदस्य, भुईंज प्रेस क्लब तसेच खर्शी ग्रामस्थ आदींनी अभिनंदन केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!