Thu, Jan 15, 2026
नोकरी मार्गदर्शन

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन
Ashok Ithape
  • PublishedAugust 19, 2024
या मेळाव्यात १० वी, १२ वी, पदवीधर, आयटीआय सर्व ट्रेड, डिप्लोमा, इंजिनिअर, कुशल / अर्धकुशल कामगार अशा प्रकारचे 1 हजार 600 पेक्षा जास्त रिक्तपदे
सातारा :-जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा यांच्या वतीने सातारा जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा दिनांक 21 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उंब्रज ता. कराड येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी सातारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा.
या मेळाव्यात १० वी, १२ वी, पदवीधर, आयटीआय सर्व ट्रेड, डिप्लोमा, इंजिनिअर, कुशल/अर्धकुशल कामगार अशा प्रकारचे 1 हजार 600 पेक्षा जास्त रिक्तपदे https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसूचित केलेली आहेत.  उमेदवारांनी शैक्षणिक कागदपत्रे घेऊन प्रत्यक्ष उपस्थित राहावे, मेळाव्यात सहभागी झालेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत.
याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयाच्या ०२१६२-२३९९३८ या दुरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राचे  सहायक आयुक्त   सुनिल पवार यांनी केले आहे.
Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!