Mon, Mar 2, 2026
अध्यात्म

श्री क्षेत्र भुईंज येथील संथ वाहणा-या कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या आचार्य भृगूमहर्षीच्या आश्रामात ज्ञानबोध ग्रंथाचे सामुदायिक पारायण

श्री क्षेत्र भुईंज येथील संथ वाहणा-या कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या आचार्य भृगूमहर्षीच्या आश्रामात ज्ञानबोध ग्रंथाचे सामुदायिक पारायण
Ashok Ithape
  • PublishedAugust 13, 2024

श्री क्षेत्र भुईंजचे महात्म्य व पावित्र्य जपा प्राचीन ऋषीमुनींच्या संदेशाने जीवनाचे कल्याण करा … गदगुरू श्री. पोपट महाराज स्वामी

भुईंज l प्रतिनिधी

श्री क्षेत्र भुईंजचे महात्य व पावित्र्य जपा प्राचीन ऋषीमुनींच्या संदेशाने जीवनाचे कल्याण करा … सदगुरू श्री. पोपट महाराज स्वामी यांनी भुईज आणि परिसरातील महिला वाचकांना व भाविकांना तिर्थक्षेत्र भुईंजचा महिमा सांगताना उलघडले अनेक घटना आणि दाखल्यांचे संदर्भ

श्री क्षेत्र भुईंज येथील संथ वाहणा-या कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या आचार्य भृगूमहर्षीच्या आश्रामात (मठात) श्री क्षेत्र नारायणपूर येथील विश्व चैतन्य प. पू. श्री सदगुरू नारायण महाराज उर्फ आण्णा महाराज वांनी लिहीलेल्या नारायण ज्ञानबोध ग्रंथाचे पारायण भुईंज आणि परिसरातील महिला भाविक सेवेकरी व अण्णांच्या लेकी ग्रूप यांच्या सहभागातून सुरू आहे. श्रावण महिन्यातील व्रतवैकल्यात ग्रंथांचे पारायण घरोघरी होत असते परंतु भुईंज येथील महिला सेवेकरी यांनी सलग चौथ्यावर्षी या पारायण सोहळयाचे नियोजन केल्याने त्यांना १०८ महिला वाचक व श्रोते वर्गास उस्फुर्त प्रतिसाद लाभात आहे.

यावेळी बोलताना सदगुरू पोपट महाराज स्वामी पुढे म्हणाले की भुईंजचा आचार्य भृगूऋषी मठ हा अध्यात्मिक क्षेत्रातील फार मोठा ठेवा आहे येथे साधकाला भाविकाला हव ते मिळवून जन्माचे कल्याण करण्याचे सामर्थ्य आहे. म्हणूनच श्री क्षेत्र नारायणपूरला येणारा प्रत्येक भाविक हा भुईज येथील या मठावर येवून स्वतः दर्शन घेवून कृतार्थ होतो असा हा महिमा आपण सर्वांनी जपला पाहिजे असे सांगून त्यांनी विविध घटना व दाखल्यांचा संदर्भ दिला.

ग्रंथात सदगुरूंनी भस्म महिमा व भुईंजच्या भृगुऋषी मठाचा जिर्णोद्धार कसा झाला याचे हि महात्म्य सांगताना नव्या पिढीला खूप काही ज्ञान मिळते असे या ग्रंथाचे महात्म सांगणाऱ्या महिला सेवेकरी व अण्णांच्या लेकी ग्रुप च्या सौ. राजश्री भोसले पाटील यांनी सांगितले. या सोहळयात शुकवारी सकाळी सांगता सोहळयास सदगुरू आण्णा महाराज व पोपट महाराज स्वामी जेष्ठ शिष्य भरतनाना क्षीरसागर हे भेट देवून मार्गदर्शन करणार आहेत. या सोहळ्याची सांगता शुक्रवार दिनांक १६ ऑगष्ट २०२४ होणार आहे. या पार्श्वभूमीवर कृष्णा नदी काठावर आचार्य भृगुऋषी मटावर देवी महालक्ष्मी मंदिरात भावीकांची गर्दी वाढत आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!