बेरोजगार युवकांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
![]()
12 वी पास प्रशिक्षणार्थींना 6 हजार, आयटीआय/पदविका प्रशिक्षणार्थींना 8 हजार आणि पदवीधर/पदव्युत्तर प्रशिक्षणार्थींना 10 हजार प्रतिमाह विद्यावेतन 6 महिन्यांपर्यंत मिळणार आहे.
सातारा दि. 31 (जि.मा.का.) – महसूल पंधरवडा 1 ते 15 ऑगस्ट या दरम्यान साजरा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने शासनाच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे. या पंधरवड्यानिमित्त युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण व त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे.
12 वी पास प्रशिक्षणार्थींना 6 हजार, आयटीआय/पदविका प्रशिक्षणार्थींना 8 हजार आणि पदवीधर/पदव्युत्तर प्रशिक्षणार्थींना 10 हजार प्रतिमाह विद्यावेतन 6 महिन्यांपर्यंत मिळणार आहे. उमेदवाराचे वय किमान 18 व कमाल 35 वर्षे असावे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नवीन प्रशासकीय इमारत, तळ मजला एस.टी. स्टॅन्ड जवळ, सातारा येथे किंवा 02162-239938 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.













