Mon, Mar 2, 2026
सामाजिक स्थानिक बातम्या

मानवता सोशल फाउंडेशनच्यावतीने वेळे येथील करुणा मंदिर गोशाळेमध्ये वृक्षारोपण.

मानवता सोशल फाउंडेशनच्यावतीने वेळे येथील करुणा मंदिर गोशाळेमध्ये वृक्षारोपण.
Ashok Ithape
  • PublishedJuly 28, 2024

वाई: मानव आणि निसर्ग यांचा संबंध हा प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. निसर्गातूनच माणसाचा जन्म झालाय आणि याच निसर्गातून माणसाच्या सर्व गरजा पूर्ण होतात. या निसर्गातील सर्वात मोठी देणगी म्हणजे वृक्ष. झाडे आहेत म्हणूनच आज आपण या पृथ्वीतलावर सुखरूप राहू शकतो. आज जगात प्रचंड प्रमाणात वृक्षतोड होत असून त्यामुळे पाऊस अनियमित झाला आहे. प्रकृतीचे संवर्धन करणे आवश्यक आहे. झाडे लावा झाडे जगवा हा मूलमंत्र जपला पाहिजे.

वाई तालुक्यातील नाविन्यपूर्ण समाज उपयोगी उपक्रम राबवणारी अग्रगण्य संस्थेपैकी एक म्हणजेच मानवता सोशल फाउंडेशन. वृक्षारोपण, व्यसनांपासून तरुणांना परावृत्त होण्यासाठी विविध उपक्रम, शाळांमधील गरीब विद्यार्थ्यांना मदत असे एक ना अनेक उपक्रम ही संस्था नियमित राबवत असते.

वृक्षारोपणाचे महत्त्व ओळखूनच संस्थेमार्फत गतवर्षी रविवार दिनांक 28 जुलै रोजी वेळे येथील करुणा मंदिर गो शाळेमध्ये सकाळी 11 वाजता विविध प्रकारच्या रोपांची लागवड करण्यात आली. या वृक्ष लागवडीमध्ये मानवता सोशल फाउंडेशनचे असंख्य कार्यकर्ते यांनी आपला सहभाग नोंदवला. वृक्षांची लागवड करणे हेच आमचे उद्दिष्ट नसून या पुढील काळात लावलेली वृक्ष मोठी केली जातील असेही यावेळी मानवता सोशल फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी आवर्जून सांगितले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!