मत्स्य विभागातर्फे धोम धरणातील ‘क्रिस्टल फिशरीज’ यांचा मत्स्यव्यावसायासाठी सन्मान
![]()
राज्य शासनाच्या मत्स्य विभागाचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन
वाई / प्रतिनिधी :
केंद्र शासनाच्या मत्स्य विभागाच्या केज फिशिंग योजनेमधून 2021 साली क्रिस्टल फिशरीज या नावाने मस्त्य व्यवसाय सुरु केला आहे. त्या अंतर्गत मत्स्य शेतीसाठी लाभार्थ्यांना सहकार्य व मार्गदर्शन करण्यात आले. ‘क्रिस्टल फिशरीज’साठी धोम धरणामध्ये ऐकून 24 केज व घर प्रस्थापित करण्यात आले आहेत. त्यासाठी कोलकात्यावरून विमानाने फगेसिस जातीचे मत्स्यबीज आणून त्याचे संगोपन करण्यात आले. त्यासाठी राज्य शासनाच्या मत्स्य विभागाचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
या वर्षी मरळ जातीच्या माश्याचे संगोपन करण्यात आले आहे. सध्या धोम धरणांतर्गत हा व्यवसाय सौ. सीता रामचंद्र सणस सांभाळत असून त्यांना त्यांचे चिरंजीव अर्जुन रामचंद्र सणस मदत करतात. केजवर 2 कामगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
अर्जुन सणस यांनी मस्त्य पालनाचे प्रशिक्षण घेतले आहे. या व्यवसायात काही अडचणी आल्या, परंतु त्यावर मात करीत आम्ही यशस्वी झालो आहोत. इतर शेतकऱ्यांनी शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यावा व आपले उत्पन्न वाढवावे व इतरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. जेणेकरून युवकांना नोकरीसाठी गाव सोडावे लागणार नाही, अशी प्रतिक्रिया श्री सणस यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान मत्स्यबीज प्रकल्पासाठी केंद्र व राज्य सरकारने आमच्यावर विश्वास दाखविला व संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानत असल्याचे व बेरोजगार युवकांनी या व्यवसायात उतरून शासकीय योजना यशस्वी करण्याबरोबरच स्वतःचा विकास साधावा असे सौ. सीता सणस यांनी म्हटले आहे.













