ते राबले, म्हणूनच वृक्ष लागले… चिंधवली कृष्णामाई किनारी स्मशानभूमी परिसरात वटवृक्षांचे रोपण.
चिंधवली l प्रतिनिधी:
पाऊस पडेल या आशेने आज उद्या वृक्षारोपण करण्यासाठी थांबलेले हात, आज चिंधवली ता.वाई कृष्णामाई किनारी राबले,
वाढती वृक्षतोड आणि पुराच्या पाण्यामुळे मोठमोठ्या झाडांचे झालेले समूळ उच्चाटन, यामुळे ओसाड झालेला कृष्णामाई किनारा हा हिरवागार करण्यासाठी तरुणाई नेहमीच राबत असते, आणि उपलब्ध होणारी रोपे तत्परतेने लावण्यासाठी ही तरुणाई नेहमीच अग्रेसर असतेच आणि त्याच टप्यावर चिंधवली येथील कै दिनकर तुकाराम पवार व कै शांताबाई दिनकर पवार यांच्या स्मरणार्थ श्री सत्यविजय दिनकर पवार यांच्या सौजन्याने, तसेच
कै मानसिंग तुकाराम पवार यांच्या स्मरणार्थ श्री मुकुंद मानसिंग पवार यांच्या सौजन्याने, तसेच
कै. विश्वास धोंडिबा मोरे यांच्या स्मरणार्थ डॉ श्री विजय विश्वास मोरे यांच्या सौजन्याने जातीवंत वटवृक्षांचे कृष्णामाई किनारी स्मशानभूमी परिसरात जागोजागी खड्डे घेऊन खतमाती टाकून ती रोपे लावण्यात आली, अगदी त्यांचे संगोपन आणि संवर्धन ही काळाची गरज ओळखून प्रत्येक झाडास लोखंडी जाळी व काटेरी कुंपण करण्यात आले.
या वृक्षारोपण मोहिमेत श्री सत्यविजय दिनकर पवार (मा.ग्रा पं सदस्य), डॉ श्री विजय विश्वास मोरे, श्री सागर दत्तात्रय पवार, सुमित राजेंद्र पवार, महेश दिग्विजय पवार, शुभम नरेंद्र पवार आदी सहभागी उपस्थितांनी परिश्रम घेतले.













