स्वर्गीय अजय थोरवे यांच्या स्मरणार्थ व्याहळी कॉलनी येथे रक्तदान शिबिर संपन्न
वाई, दि. 16 जुलै : रक्त आपल्या शरीरातील अत्यंत आवश्यक अशा घटकांपैकी एक आहे, जेशरीराला सुरळीत काम करण्यास मदत करते. रक्तदान हे लोकांनी आपले निरोगी रक्त गरजू व्यक्तींसाठी
दान करण्याची पवित्र कृती आहे. जास्त प्रमाणात रक्त कमी झाल्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो म्हणून, आपण असे म्हणू शकतो कीरक्तदान हे जीव वाचवण्याची कृती आहे. रक्तदान
हे जीवनदान आहे.
व्याहळी कॉलनी येथील युवक स्वर्गीय अजय दिगंबर थोरवे यांचे सहा वर्षांपूर्वी अचानक अकस्मात निधन झाले. ही निधनाची वार्ता
सर्वांनाच सुन्न करणारी होती. तदनंतर दरवर्षी त्याचेवडील दिगंबर थोरवे, त्याचा मोठा भाऊ निलेश थोरवे यांनी आपल्या भावाच्या
स्मृती सदैव स्मरणात ठेवण्यासाठी दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन सुरु केले. दरवर्षीच याला उत्स्फूर्त असा पाठिंबा मिळतो.चालू वर्षी स्वर्गीय अजयचे सहावे पुण्यस्मरण होते. यावर्षी मोरया रे ग्रुप व्याहळी कॉलनी व कराड हिंदरत्न प्रकाशबापू पाटील ब्लड बँक सेंटर सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक
13 जुलै 2024 रोजी सकाळी आठ ते पाच या वेळेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्याहळी कॉलनी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
व्याहाळी कॉलनी गावचे ग्रामस्थ तसेच स्वर्गीय अजय थोरवे यांच्यावर प्रेम करणारे असंख्य चाहते यांनी पवित्र असं
रक्तदानाचं कार्य यावेळी पार पाडले. यावेळी व्याहळी कॉलनी तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने रक्तदानासाठी उपस्थित होते. यावेळी 56 रक्तदात्यांनी रक्त देऊन रक्तदान हेच श्रेष्ठ दान आहे हे सिद्ध केलं. सर्वच रक्तदात्यांना आकर्षक अशी भेटवस्तू मिळाली.एवढ्या मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेल्या रक्तदान शिबिराविषयी व्याहळी कॉलनी ग्रामस्थांनी आनंद व समाधान
व्यक्त केले आहे.













