सर्वोदय ट्रस्टतर्फे चांदवडीत केशर आंबा झाडांचे मोफत वाटप
वाई / प्रतिनिधी : सर्वोदय ट्रस्टच्या वतीने चांदवडी (ता. वाई) येथे सामाजिक बांधिलकीतून व पर्यावरण संवर्धनाच्या हेतूने इच्छुक शेतकऱ्यांना मोफत केशर आंबा या झाडाचे वाटप करण्यात आले.
सर्वोदय ट्रस्टच्या माध्यमातून संपन्न झालेल्या या कार्यक्रमास चांदवडी गावच्या सरपंच फरीदा अहमद शेख, ग्रामपंचायत सदस्या यमुना सर्जेराव काकडे, ग्रामपंचायत सदस्या सौ. रेखा संतोष शिंदे, सौ. स्नेहल अमोल शिंदे, ग्रामपंचायत सदस्य संतोष जनार्दन शिंदे, तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक प्रकाश पाटलू शिंदे, रमेश शंकर शिंदे, बाळासाहेब गाडेकर, दत्तात्रय बाळासाहेब पोळ, सुरेश अण्णा शिंदे, सूर्यकांत सदाशिव शिंदे, संपत महादेव शिंदे, हिरालाल दिनकर शिंदे, शरद सहदेव मांढरे, विठ्ठल सहदेव शिंदे, शरद प्रभाकर शिंदे, आबासाहेब मोरे, गणपत काकडे, अरविंद दादा काकडे, संजय किसन शिंदे, सचिन प्रकाश शिंदे तसेच गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ व महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमास सर्वोदय ट्रस्टचे अध्यक्ष संजय ज्ञानदेव जेधे, धनावडे, बापू फणसे, ज्ञानदेव वाशिवले, अनिकेत गाढवे आदी विश्वस्त उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामविकास अधिकारी शेंडे मॅडम व सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे सहकार्य लाभले. सर्वोदय ट्रस्टच्या या उपक्रमाबद्दल ट्रस्टच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.













