Mon, Mar 2, 2026
शेतीविषयक बातम्या सहकार

‘किसन वीर’ चे सोमवारी मील रोल पुजन

‘किसन वीर’ चे सोमवारी मील रोल पुजन
Ashok Ithape
  • PublishedJuly 6, 2024

भुईंज, दि.६  : किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२४-२५ मील रोलरचे पुजन सोमवार (दि.८) रोजी सकाळी ११ वाजता सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन व कारखान्याचे मार्गदर्शक संचालक नितीनकाका पाटील यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी दिली.

प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की, कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील यांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे कारखान्याला एनसीडीसीमार्फत कर्ज मंजुर झालेले असल्यामुळे ऊस उत्पादक सभासदांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. आमदार मकरंदआबा पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने शेतकरी व कामगारांच्या विश्वासावर मागील दोन हंगाम कोणत्याही बँकेचे वित्तसहाय्य न घेता यशस्वी करून दाखविले. सन २०२४-२५ चा गळीत हंगामही आपण याच विश्वासाच्या जोरावर यशस्वी करणार असून शेतकऱ्यांनी आपला ऊस किसन वीर कारखान्यालाच घालावा, असे आवाहनही संचालक मंडळाच्यावतीने केले.

सन २०२४-२५ च्या मील रोल पुजन समारंभासाठी कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व सभासद बंधू-भगिनी, हितचिंतक, कंत्राटदार, वाहन मालक आणि कार्यकर्त्यानी उपस्थित रहावे, असे आवाहनही व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे व संचालक मंडळाने केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!