Thu, Jan 15, 2026
सामाजिक

भटकी कुत्री बनतायेत शाळकरी मुलांचा घात

भटकी कुत्री बनतायेत शाळकरी मुलांचा घात
Ashok Ithape
  • PublishedJune 26, 2024

शाळकरी मुलांच्या मनात बसतीये भटक्या कुत्र्यांची भीती प्रशासनाचे कान, ताेंड, डाेळे बंदच…

वाई l कुमार पवार

मधल्या आळी येथेल घडलेली घटना. भद्रेश्वर पतसंस्थेच्या पाठीमागे असणाऱ्या क्लासला जाणाऱ्या चिंचकर यांच्या घरातील छोट्याशा शाळकरी मुलावर दहा ते पंधरा कुत्र्यांनी हल्ला केला. सुदैवाने मी तिथे असल्याने त्या कुत्र्यांना हकलवुन लावले. पण तिथे ताे मुलगा एकटा असता, तर काय झाले असते, याचा विचारही करू शकत नाही.

सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मी भद्रेश्वर पतसंस्थेमध्ये काही कामानिमित्त गेलो होतो. भद्ररेश्वर पतसंस्थेच्या पाठीमागील बिल्डिंगमध्ये क्लासेस आहेत. याच क्लासमध्ये जाणारा चिंचकर यांच्या घरातील एक मुलगा बराच वेळ महिला मंडळ शाळेच्या कोपऱ्यावरती उभा होता. त्याच रस्त्यावरून जाणाऱ्या एका महिलेने त्या मुलास, “तु का उभा आहेस” असे विचारले. “मी क्लासला चाललोय पण कुत्री माझ्या अंगावर येत आहेत” असे त्याने घाबरूच सांगितले. ताे मुलगा १५ मिनिटे तिथे उभा हाेता. त्याच वेळेस मी खाली गाडी जवळ आलो असता, त्या महिलेने मला सांगितले याला तिकडे सोडा. त्या मुलास मी भद्रेश्वर पतसंस्थेच्या पाठीमागील बोळात साेडण्यासाठी घेऊन जात असताना, अचानक पतसंस्थेच्या खालच्या बाजूला पंधरा ते वीस कुत्र्यांच्या टाेळक्याने त्या मुलाच्या दिशेने धाव घेतली. माझ्या डाव्या बाजुस ताे मुलगा पुढे चालला हाेता व कुत्री उजव्या बाजुला हाेती. अचानक कुत्री उठली, त्यांनी माझ्या पुढे जाऊन त्या मुलाच्या अंगावर धाव घेतली. मी जाेरात आेरडलाे, तेथे पडलेल्या दगडांनी त्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला. पण ती कुत्री माेठ माेठ्यानी भुंकत आंगावरच येत हाेती. मी त्या मुलाला भद्रेश्वर पतसंस्थेच्या इमारतीत पळण्यास सांगितले. व दगडांनी त्या कित्र्यांना पिटाळले. मी स्वतःही त्या क्षणी घाबरलेल्या अवस्थेत होतो. त्या कुत्र्यांच त्या मुलाच्या अंगावर जाणं, हे माझ्या डाेळ्यासमाेरून जात नाही, असला भयानक प्रकार घडलेला हाेता. त्या कुत्र्यांना बघुन तो मुलगा येवढा घाबरला की, त्या मुलाच्या ताेंडुन शब्द फुटत नव्हते. अक्षरशः पुढील १० मिनिटं त्या मुलाचं रडण थांबल नाही.

ज्यावेळेस ती कुत्री अचानक धावून अंगावर आली, त्यावेळेस माझी ही अवस्था अतिशय वाईट झालेली होती. माझे ही पाय थरथर कापत होते. दहा ते पंधरा कुत्री अंगावर धावून येणे म्हणजे काय असते हे मला त्या क्षणी कळले. माझी जर ही अवस्था असेल तर त्या मुलाची काय स्थिती असेल. अक्षरशः टारगेट करून अंगावर धावून येणे अशी त्या कुत्र्यांची वागणूक होती. त्या क्षणाला त्या मुलागा रडताना त्याच्या तोंडातून आवाज सुद्धा फुटत नव्हता. फार घाबरलेला हाेता. त्याला शांत करून त्याचे नाव विचारले. व लगेच त्या क्षणी मी विवेक चिंचकर यांना फोन करून त्या मुलाच्या घरी घडलेला प्रकार सांगण्यास सांगितला.

मी व आमच्या सहकारी अनेक पत्रकारांनी या भटक्या कुत्र्यांच्या बातम्या दिल्या आहेत. वाईत राेज असे प्रकार घडत आहेत. हे सर्व प्रकार प्रशासनाला समक्ष सांगण्यात आले आहेत, पण कारवाई करण्यास काेणी तयार हाेत नाही. प्रशासन येवढ्या गंभीर विषयावर डाेळेझाक का करत आहे. एखाद्याचा जीव गेल्यावरच यांचे डाेळे उघडणार का? पशुप्रेमींणी सुध्दा या घटनांकडे गांभीर्याने पहाणे गरजेचे आहे. प्रेम असावे पण डाेळे, कान, ताेंड बंद ठेऊन नसावे. एखाद्याचा जीव गेल्यावर पुढे येऊन काम करणे ही माणुसकी नाही. यावर वाईकर नागरिकांनी गांभिर्याने दखल घेऊन आवाज उठविणे गरजेचे आहे.

या घटनेनंतर मी गप्प बसावे, हे मला पटले नाही म्हणूनच हे लिखाण केले आहे. नक्कीच प्रत्येक वाईकरांजवळ हे लिखाण पाेहचावे. त्यामुळे भविष्यातील हाेणार्‍या दुर्दैवी घटनांना आळा बसेल.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!