Thu, Jan 15, 2026
पर्यावरण

वाई अर्बन बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण

वाई अर्बन बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण
Ashok Ithape
  • PublishedJune 24, 2024

वाई l प्रतिनिधि:

वाई, दि 23 – दि वाई अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या 103 व्या वर्धापन दिनानिमित्त वेळे (ता. वाई) येथील करुणा मंदिर परिसरात 103 झाडे लावण्याची सुरुवात आज करण्यात आली. याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष अनिल देव, उपाध्यक्ष डाँ. शेखर कांबळे, माजी अध्यक्ष अरुण देव,रिझर्व बँकेतील निवृत्त अधिकारी अविनाश जोशी, संचालक विवेक पटवर्धन, माधव कान्हेरे, रमेश ओसवाल, मकरंद मुळे, काशिनाथ शेलार, अशोक लोखंडे, चंद्रकांत गुजर, प्रीतम भुतकर, संचालिका सौ ज्योती गांधी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीपाद कुलकर्णी, प्रा किशोर अभ्यंकर, चंद्रकांत मापारी व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले
याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात भारत विकास परिषदेच्या माजी अध्यक्षा सीए प्रवीणा ओसवाल, ग्राहक पंचायतच्या सौ शुभदा नागपूरकर, डॉ. सस्मिता सनकी आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

करुणा मंदिर परिसराचे व्यवस्थापक विवेक भिडे यांनी जैन बांधवांनी सुरू ठेवलेल्या करुणा मंदिर व गोशाला पालन या विषयीची माहिती दिली. जैन बांधवांतर्फे सामाजिक जाणीवेतून गो वंशाचे पालन व्हावे, या भावनेतून कत्तलखान्याकडे नेण्यात येणारी जनावरे, शेतकऱ्यांना नको असलेल्या भाकड गाई व मुक्या जनावरांचे पालन पोषण व उदरभरण केले जाते. याबाबतची माहिती दिली वाई परिसरातील सामाजिक संस्था व व्यक्तींनी आपले वाढदिवस या परिसरात साजरी करावेत व त्या जनावरांना खाऊ पिऊ घालून आशीर्वाद मिळवावे, या मुक्या जनावरांना चारा उपलब्ध करून द्यावा किंवा चाऱ्यासाठी देणगी द्यावी,असे आवाहन त्यांनी केले.

प्रीतम ओसवाल यांनी प्रास्ताविकात करुणा मंदिर परिसरात लवकरच संगमरवरी दगडात मोठे जैन मंदिर बांधण्यात येणार असल्याची माहिती दिली सुमारे 18 एकर परिसरात वसलेल्या या उपक्रमाची सुरुवात दिलीप भंडारी यांनी केल्याचे त्यांनी सांगितले.
बँकेचे उपाध्यक्ष डॉक्टर शेखर कांबळे यांनी वृक्षारोपणासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमास भाजपचे कार्यकारिणी सदस्य अविनाश फरांदे, किशोर फुले, सुनंदा कट्टे, भारती कुलकर्णी, सुनील साठे, भंवरलाल ओसवाल, पत्रकार दौलतराव पिसाळ, बँकेचे सरव्यवस्थापक चंद्रशेखर काळे व अधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!