Thu, Jan 15, 2026
सामाजिक

निलेश चव्हाण यांच्या कॉर्पोरेट ‘रोटरी क्लब ऑफ स्कॉन प्रो’. 2024 चा पदग्रहण कार्यक्रम संपन्न

निलेश चव्हाण यांच्या कॉर्पोरेट ‘रोटरी क्लब ऑफ स्कॉन प्रो’. 2024 चा पदग्रहण कार्यक्रम संपन्न
Ashok Ithape
  • PublishedJune 23, 2024

पुणे l प्रतिनिधी:

स्कॉन प्रोजेक्ट्स प्रा लिमिटेड चे सर्वेसर्वा श्री निलेश चव्हाण यांनी सामाजिक बांधीलकीचे भान त्यांच्यातील सह्रदयी माणसाने सदैव जपले आहे. त्यातूनच आपण समाजाचे काही देणं लागतो त्यातूनच स्थापन झालेला ‘ रोटरी क्लब ऑफ स्कॉन प्रो’ आणि या क्लब 2024 चा पदग्रहण सोहळा नुकताच संपन्न झाला.

रोटरी क्लब ऑफ स्कॉन प्रो, पुणे’ च्या अध्यपदी प्रशांत सुर्डीकर यांची निवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या पदग्रहण समारंभामध्ये त्यांनी पदांची शपथ घेतली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पुणे विभागाचे जीएसटी सहायक आयुक्त डॉ. राहुल गोरडे उपस्थित होते.

यंदाच्या वर्षी क्लबतर्फे ‘आनंदी शाळा, आनंदी गाव’, हा सामाजिक प्रकल्प राबविण्यात येणार आहे. तसेच आपल्या तालुक्यातील गावामध्ये या वर्षात समाजपयोगी कार्यक्रम राबवणार आहेत. कार्यक्रमाला रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे प्रांतपाल शीतल शहा, उपप्रांतपाल शिल्पागौरी गणपुले, उद्योजक निलेश चव्हाण, चार्टर प्रेसिडेंट महेश मायदेव, अभिजित बोनगीरवर, विशाल भोसले, राहुल पुरकर, कुंदन तांबडे, संजय रोडे , नंदिनी चव्हाण, अंजली काळे, दत्तात्रय देसाई, अपूर्वा ब्राह्मणे, संदीप देवकर, अनिल हिंगे, शशांक मोरे, किशोर दरेकर , रमेश मिसाळ, श्रीकांत चव्हाण, संजय कोळी अमोल आवळे, सागर भोकरे, निनाद चव्हाण, निहार चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

महेश देशपांडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!