दुर्गम भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थीनींना गरवारे टेक्निकल फायबर्स फाऊंडेशनच्या वतीने सायकल वाटप
वाई, दि. २२ : येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय. टी. आय.) येथील दुर्गम भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थीनींना गरवारे टेक्निकल फायबर्स फॉउंडेशन च्या वतीने सायकल वाटप करण्यात आले.
औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय. टी. आय.) येथे दुर्गम भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थीनींना सेवा सहयोग संस्था यांच्या मागणी नुसार गरवारे टेक्निकल फायबर्स फॉउंडेशन यांच्या वतीने सायकल वाटप करण्यात आले. यावेळी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी अरविंद कुलकर्णी, राजेंद्र शिवराईकर, सेवा सहयोग संस्थेच्या कविता साठे, अक्षय सोनावणे, अर्चना टिके यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अरविंद कुलकर्णी, राजेंद्र शिवराईकर व कविता साठे यांच्या हस्ते विद्यार्थीनींना सायकलचे हस्तांतरण करण्यात आले. यावेळी सायकल दिल्याबद्दल औद्योगिक प्रशिक्षण संस्ठेच्या वतीने सौ. नीता पिसाळ व सौ. रोहिणी कदम यांच्या हस्ते अरविंद कुलकर्णी, राजेंद्र शिवराईकर व कविता साठे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी रोहिणी कदम यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विविध उपक्रमांविषय माहिती दिली. नितीन जगताप सर यांनी सुत्रसंचलन केले. सौ. नीता पिसाळ यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य मिलिंद उपाध्ये, कंपनीचे अधिकारी अंशुमन जगदाळे, सुनील पानसे, कुमार पवार, सेवा सहयोग संस्थेचे समन्वयक चंदन देशमुख यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमास औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे स्वप्नील सांगळे, निलेश गायकवाड, दत्तात्रय पवार, रमेश चव्हाण, हेमंत निकम, पूजा गुजर, रेश्मा मोरे, अविष्कार पोळ, दिलीप पवार, शिक्षक, विध्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होत्या.













