Mon, Mar 2, 2026
सहकार

सातारा जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांसाठी ऊस तोडणी, वाहतूक व कमिशनचे दरपत्रक निश्चित

सातारा जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांसाठी ऊस तोडणी, वाहतूक व कमिशनचे  दरपत्रक निश्चित
Ashok Ithape
  • PublishedJune 14, 2024

गाळप हंगाम २०२४/२५ करिता सातारा जिल्ह्यातील सहकारी व खाजगी १८ साखर कारखान्यांचा सर्वानुमते निर्णय

सातारा l प्रतिनिधी:
गेल्या काही वर्षामध्ये ऊस वाहतूकीसंदर्भात जिल्हयातील ऊस वाहतुकदरांमध्ये एकसुत्रीपणा नसल्यामुळे वाहतूकदार व साखर कारखान्यांमध्ये आर्थिक कारणांमुळे समस्या निर्माण होत होत्या. यावर मार्ग काढणेसाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पुढाकार घेवून जिल्हयामध्ये सर्व साखर कारखान्यांची एकत्रित बैठकांचे आयोजन केले.

सदर साखर कारखान्यांच्या ऊस वाहतुक दरासंदर्भात आयोजित केलेल्या बैठकांकरीता साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक, शेती अधिकारी उपस्थित होते. सदर सभांकरीता बँकेचे संचालक मा.आ.श्रीमंत छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले, बँकेचे अध्यक्ष मा.श्री.नितीन पाटील, माजी आमदार मा.श्री .प्रभाकर घार्गे यांनी पुढाकार घेवून संपूर्ण सातारा जिल्हयातील एकूण १८ साखर कारखा-यांचा ऊस तोडणी व बैलगाडी, ट्रॅक्टर गाडी, ट्रक/ट्रॅक्टर चारचाकी ट्रोली वाहतूकीचा तसेच ऊस तोडणी मशिन इत्यादिंसह सर्व यंत्रणांचे संपूर्ण जिल्हयाकरीता एकच ऊस तोडणी वाहतूक व कमिशनचे दरपत्रक आज दि.१४/०६/२०२४ रोजी सादर करुन सर्व साखर कारखान्यांनी सदर दरपत्रपत्रकास मान्यता दिली असून त्यानुसार सर्व साखर कारखान्यानी अंमलबजावणी करणेचे निश्चित केले.


साखर कारखान्यांचे ऊस वाहतूक दर व कमिशनबाबत वेळोवेळी आयोजित केलेल्या बैठकांकरीता बँकेचे संचालक मा .आ .श्रीमंत छ .शिवेंद्रसिंहराजे भोसले, बँकेचे अध्यक्ष मा .श्री .नितीन पाटील, मा .श्री .प्रभाकर घार्गे, मा .श्री .प्रदीप विधाते व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे उपस्थित होते .
याप्रसंगी आदर्शवत दरपत्रक ठरविलेबद्दल साखर कारखान्यांचे पदाधिकारी व अधिकारी यांनी बँकेचे मा .आ .श्रीमंत छ .शिवेंद्रसिंहराजे भोसले, मा .अध्यक्ष श्री .नितीन पाटील, मा .श्री .प्रभाकर घार्गे, मा .श्री .प्रदीप विधाते व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अभिनंदन करुन आभार मानले.

यासभेस बँकेचे अध्यक्ष मा .श्री .नितीन पाटील, जिल्हयातील साखर कारखान्याचे चेअरमन, किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री .रनवरे, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री .मोहिते, सहयाद्रि सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री .आबासाहेब पाटील, लोकनेते बाळासाहेब देसाई सह .साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री .देसाई तसेच सर्व कारखान्यांचे शेती अधिकारी उपस्थित होते .

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!