महाराष्ट्र साहित्य परिषद, वाई शाखेचा पुनरुज्जीवन सोहळा दिमाखात साजरा.
वाई l प्रतिनिधी
वाई येथे, महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा, पुनर्जीवित करण्यासाठी. वाईत दि.८ जुनला कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. संमेलन अध्यक्ष सुप्रसिद्ध जेष्ठ कवी अरुण म्हात्रे होते. त्यांच्या बहारदार कवितांयुक्त भाषणाने श्रोते मंत्रमुग्ध झाले.
प्रमुख पाहुणे साहित्य परिषदेचे कार्यअध्यक्ष मिलिंद जोशी यांनी, वाई शाखे कडुन येथून पुढे असेच दिमाखादार कार्यक्रम व्हावे, व साहित्य चळवळ जोमाने चालवावी, लागेल ती मदत करु अशी भावना व्यक्त केली.
यावेळी प्रमुख कार्यवाह, सौ.सुनिताराजे पवार यांनी सुध्दा नवनिर्वाचित कमिटीला मार्गदर्शन केले. कोषाध्यक्ष, विनोद कुलकर्णी हे सुध्दा उपस्थित होते. जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकीहाळ यांनी, वाई शाखेची नवनिर्वाचित म. सा. प. कमिटी जाहीर केली. तर वाईतील जेष्ठ साहित्यिक, कवी लक्ष्मिकांत रांजणे यांच्या सुत्रसंचालनाने कार्यक्रमाला छान रंगत आणली.
पांचगणीतील प्रसिद्ध कित्तूरकर डेंटल क्लिनीकचे.डाॅ.अमर कित्तूरकर यांनी साहित्य चळवळ ही, संस्कारक्षम नवपिढी घडण्यासाठी गरजेची आहे. असे सुचित करत वाई शाखेस आर्थिक हातभार लावला.
वाईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सचिन सावंत, इंद्रजा बिल्डर्स यांनी साहित्य चळवळ जोपासनेसाठी प्रयत्न करणार्या, सर्व कवींचे कौतुक करुन. या कार्यक्रमासाठी आर्थिक हातभार लावला. तसेच उद्योजक, प्रमोद अनपट. रुद्र सप्लायर्स यांनी सुध्दा योग्य ठिकाणी आर्थिक हातभार लावल्याचे समाधान व्यक्त केले.
सातारा जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकीहाळ यांनी म. सा. प. वाई शाखेची नुतन कार्यकारिणी जाहीर केली. अध्यक्ष म्हणून बावधनचे जेष्ठ कवी, विलास बापू पिसाळ. उपाध्यक्ष- विजय वसंत जगताप, व अरूण आदलिंगे, सचिव-अजित क्षीरसागर, कोषाध्यक्ष – सौ.मंगल चव्हाण व ज्ञानेश सुर्यवंशी व कार्यवाह म्हणुन प्रताप महांगडे व क्रांती पाटील यांची निवड करण्यात आली. इतर सदस्य निवडण्याची जबाबदारी नुतन अध्यक्षांवर सोपवली असून कमिटी पुर्ण करण्यास सांगितले आहे.
या कार्यक्रमात वाई व परिसरातील ३५ कवींनी सहभाग नोंदवला. अनेक वेगवेगळ्या विषयांवर विविध कविता सादर केल्या गेल्या.
विलास पिसाळ यांचा, उरेय सरी या कविता संग्रहाचे, तर अजित क्षीरसागर यांच्या जिवन चुका एक संधी या कथासंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. राजेश भोज सरांनी सर्वांचे आभार मानले, तर प्रताप महांगडे यांनी या कार्यक्रमाची सांगता केली.













