Mon, Mar 2, 2026
सातारा जिल्हा

सचिन सावंत यांना प्राइड ऑफ इंडिया भास्कर ॲवॉर्ड प्रदान

सचिन सावंत यांना प्राइड ऑफ इंडिया भास्कर ॲवॉर्ड प्रदान
Ashok Ithape
  • PublishedJune 7, 2024

वाईतील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा गोव्यातील कार्यक्रमात सन्मान

पणजी / प्रतिनिधी – वाईतील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सचिन सावंत यांचा महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनतर्फे प्राइड ऑफ इंडिया भास्कर ॲवॉर्डने नुकताच गोव्यामध्ये सत्कार करण्यात आला. माजी केंद्रीय कायदामंत्री ॲड. रमाकांत खलप यांच्या हस्ते गोवा सरकारच्या पणजीतील सांस्कृतिक सभागृहात हा पुरस्कार श्री. सावंत यांना प्रदान करण्यात आला.

जर्नालिस्ट फाउंडेशनतर्फे सलग 19 व्या वर्षी अखिल भारतीय स्तरावरील भास्कर भूषण पुरस्कार वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी गोव्यातील ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री विनायक खेडेकर होते. याप्रसंगी शिर्डीचे माजी नगराध्यक्ष व गोव्यातील प्रगतिशील शेतकरी पद्मश्री संजय पाटील, गोवा राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष राजतिलक नाईक, लावणीसम्राज्ञी आरती काळे- नगरकर, वैशाली वाफळेकर, ‘अग्निहोत्र’च्या नलिनीदीदी पोतदार आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

वाई परिसरासह सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी सचिन सावंत यांनी अनेक उत्तमोत्तम इमारतींची उभारणी केली असून कल्पक व प्रामाणिक बांधकाम व्यावसायिक म्हणून त्यांचा सर्वत्र नावलौकिक आहे. निवासी संकुले, शासकीय , निमसरकारी कार्यालये, विद्यालय मंदिरे आदींसह विविध इमारती शिल्पाप्रमाणे घडवणारे बिल्डर म्हणूनही सचिन सावंत यांची सर्वत्र ओळख आहे. व्यवसायाच्या बरोबरीनेच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या विविध उपक्रमांतही त्यांचा सक्रिय सहभाग असतो. समाजकारणाबरोबरच व्यावसायिक भरारी घेत असलेल्या या जिद्दी व्यक्तिमत्वाला हा मानाचा पुरस्कार प्रदान करत असल्याचे समाधान वाटते, असे मान्यवरांनी यावेळी पुरस्कार प्रदान करताना श्री. सावंत यांच्या विषयी गौरवोद्गार काढले.

फाउंडेशनचे अध्यक्ष राजीव लोहार, मनीषा लोहार, धनंजय कुंभार, उपाध्यक्ष दत्ता मर्ढेकर, कु. प्राजक्ता लोहार आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या पुरस्काराबद्दल सचिन सावंत यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!