Mon, Mar 2, 2026
साहित्य

वाई येथे भव्य कवी संमेलनाचे आयोजन

वाई येथे भव्य कवी संमेलनाचे आयोजन
Ashok Ithape
  • PublishedJune 5, 2024

वाई l प्रतिनिधी:

महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा वाई. यांच्यावतीने गंधर्व रिसॉर्ट, वाई सुरूर रोड. येथे दिनांक 8 /6 /2024 या दिवशी साडेनऊ ते चार वाजेपर्यंत, भव्य असा कवी संमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे.

वाईतील, महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा. मागील काही वर्षापासून बंद होती. ती पुनर्जीवित करण्याच्या उद्देशाने, वाईतील जेष्ठ कवी बावधन येथील विलास पिसाळ यांनी, वाईतील विविध साहित्यिकांना आवाहन केले व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सभासद करून घेतले. याला वाईतील नव साहित्यिकांनी जोरदार प्रतिसाद दिला. यातूनच वाईतील कवी. श्री अजित क्षीरसागर,कवी अरुण आदलिंगे. कवियत्री क्रांती पाटील व मंगल चव्हाण तसेच प्रसिद्ध व्याख्याते व कवी. प्रताप महांगडे यांनी, वाई परिसरातील साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे या दृष्टिकोनातून या कार्यक्रमासाठी विशेष प्रयत्न केले.

त्यामुळे वाईतील सभासदांनी व इतर व्यवसायिकांनी. कार्यक्रमासाठी सढळ हाताने देणगी दिली. यामुळे हा कार्यक्रम सुप्रसिद्ध जेष्ठ कवी अरुण म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली व मसपा.चे कार्यअध्यक्ष मिलिंद जोशी, तसेच सातारा प्रतिनिधी, रवींद्र बेडकीहाळ, विनोद कुलकर्णी, सुनिता राजे पवार, व वाईतील प्रसिद्ध लेखक, विचारवंत, डॉ.शंतनू अभ्यंकर, डॉ.उल्का कदम, सतिश कुलकर्णी, जेष्ठ पत्रकार दत्तात्रय मर्ढेकर, विजय मुळीक. यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!