तिरंगाचा निकाल यंदाही शंभर टक्के
![]()
आलिना मोमीन ९५.६० % गुण मिळवून प्रथम
भुईंज : पाचवड, ता. वाई येथील तिरंगा इंग्लिश स्कूलचा सलग चौदाव्या वर्षी दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत आलीना उमर मोमीन हिने ९५.६०% गुण मिळवून प्रथम, अरमान अकबर मुलानी याने ९२.८०% गुण मिळवून द्वितीय, गायत्री दीपक बाबर हिने ९२.६०% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला असून श्रावणी रमेश भोसले हिने ९२.४०%, चैतन्य गुरुप्रसाद घोरपडे याने ९१.८०%, वैष्णवी सचिन जाधव हिने ९१.८०%, तनिष्का भाऊसो गुंजाळ हिने ९०.८०%, अर्चित प्रशांत शिंदे याने ९०.८०%, श्रावणी संदीप गायकवाड हिने ९०.६०%, नेहा मंगेश बाबर हिने ९०.००% गुण मिळवले आहेत. तसेच २७ विद्यार्थ्यांनी ८०% पेक्षा अधिक गुण प्राप्त केले असून या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका सौ मनीषा पोळ, विषय शिक्षक प्रतीक बोराटे, जयश्री काळे, शितल बाबर, गणेश शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती पुष्पलता गायकवाड, सचिव जयवंत पवार, प्राचार्या सौ. वनिता पवार, मुख्याध्यापिका सौ. वैशाली कुंभार यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
या नेत्रदीपक यशासाठी प्रयत्न करताना सर्व शिक्षकांनी आपले विद्यार्थी विविध क्षेत्रात कसे अग्रेसर राहतील यासाठीही प्रयत्न सुरू ठेवले आहेत. तसेच संस्थेच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेच्या माध्यमातून विविध सनदी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन उपलब्ध करून उज्वल भविष्य घडवण्याची प्रेरणा दिली जाते. तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निवासी वर्ग चालवून विशेष परिश्रम घेतले जातात. त्याच परिश्रमाचे फळ म्हणजे हा निकाल आहे. त्याबद्दल सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.













