Tue, Mar 3, 2026
अध्यात्म

सद्गुरूंच्या प्रकुर्ती स्वास्थ्यासाठी भुईंज येथे आचार्य भ्रूगूऋषि आश्रमात तीन दिवसीय पारायण.

सद्गुरूंच्या प्रकुर्ती स्वास्थ्यासाठी भुईंज येथे आचार्य भ्रूगूऋषि आश्रमात तीन दिवसीय पारायण.
Ashok Ithape
  • PublishedMay 29, 2024

भुईंज l प्रतिनिधी :

श्री क्षेत्र नारायणपूर जिल्हा पुणे येथे येणाऱ्या राज्यभरातील महिलां भाविकांचे प्रातिनिधिक स्वरूपात 31 महिलांनी भुईंज येथील कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या आचार्य भ्रूगूऋषि आश्रमात विश्वचैतन्य परम पूज्य श्री सदगुरू नारायण उर्फ आण्णा महाराज यांच्या प्रकुर्ती स्वास्थ्य साठी व येणाऱ्या गुरुपौर्णिमा उत्सवात सद्गुरू आण्णा महाराज पूर्वीप्रमाणे भक्तगणांना दर्शनासाठी पहायला मिळावेत हा संकल्प घेऊन या सर्व महिला सेवेकरी तीन दिवसांच्या सद्गुरु रचित नारायण ज्ञानबोध या ग्रँथाचे पारायण व अखंड नामजप करीत आचार्य भ्रूगू महर्षी व देवी महालक्ष्मी ला साकडे घालण्यात आले.

या सर्व सेवेकरी महिलांच्या व्यवस्थेची जबाबदारी भुईंज मठाच्या महिला सेवेकरी, दत्त सेवेकरी यांनी घेतली होती, गुरुपौर्णिमा उत्सवाच्या अगोदर भुईंज येथील या आश्रमात अध्यआत्मिक व विविध साधना, व्रत असे धार्मिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती सेवेकरी रवींद्र भोसले पाटील, बबनराव भोसले, अतुलबुवा भोसले, प्रल्हाद तात्या जाधव, अनिल उर्फ बंडूनाना गुरव, राजेंद्र वारागडे, सयाजी दगडे, अजय,खरे, विटलबुवा शेवते, सुनील जगताप यांनी दिली.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!