Mon, Mar 2, 2026
सातारा जिल्हा

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ ने करून दाखवले

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ ने करून दाखवले
Ashok Ithape
  • PublishedMay 17, 2024

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद याशनी नागराजन यांच्या मतदानाचा टक्का वाढवण्याच्या आवाहनास रखरखत्या उन्हातही उत्स्फूर्त प्रतिसाद

सातारा / प्रतिनिधी

जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी व स्वीप कक्षाच्या जिल्हा नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी केलेल्या आवाहनाला रखरखत्या उन्हाची तमा न बाळगता उमेद अंतर्गत कार्यरत टीमने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उमेद मध्ये कार्यरत प्रेरिकांनी गृहभेटी, प्रत्यक्ष पात्र मतदारांची भेट घेऊन मतदानासाठी घराबाहेर पडून मतदान करण्यास प्रोत्साहित केले. यामुळेच गत वर्षीपेक्षा उन्हाची तीव्रता अधिक असूनही गतवेळच्या तुलनेत मतदानाचा टक्का लक्षणीयरित्या वाढला. गत वेळी ६०% टक्के मतदान सातारा लोकसभे साठी झाले होते.यंदा हेच मतदान सायंकाळी पाच वाजेपर्यंत 54 % इतके झाले असून जिल्हयाचा अंतिम मतदानाचा टक्का गतवर्षीच्या तुलनेत वाढण्याची शक्यता आहे.
स्विप कक्षाच्या नोडल अधिकारी याशनी नागराजन यांनी सातारा जिल्ह्यातील शंभर टक्के मतदान करून घेण्यासाठी 2 मे 2024 पासून जोरदार तयारी केली होती. जिल्हा विकास प्रशासन आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यामध्ये सक्रिय सहभागी झाले. यामध्ये गाव पातळीवर कार्यरत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद टीमने याशनी नागराजन व प्रकल्प संचालक संतोष हराळे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंहाचा वाटा उचलला आहे.
मतदान टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदार जनजागृती अभियान मोठ्या प्रमाणात राबविण्यात आले यामध्ये मोटर सायकल रॅली, पोस्टर प्रदर्शन, गृह भेटीद्वारे पत्रक वाटप करण्यात आले. याबरोबरच मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी युट्युब लाईव्ह च्या माध्यमातून उमेद अंतर्गत कार्यरत सुमारे १० हजार महिलांशी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधत मतदान वाढवण्यासाठी कशा पद्धतीने कार्यवाही करावी यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
यामुळे जिल्ह्यातील सुमारे 15,187 बचत समूह , 967 ग्राम संघ आणि 51 प्रभाग संघाच्या बैठका घेवून या माध्यमातून सुमारे 17000 समुदाय संस्थांचे सदस्य पदाधिकारी कंबर कसून मतदार जनजागृतीसाठी मैदानात उतरले.

उमेद टीमने रखरखत्या उन्हाची कसलीही पर्वा न करता ग्रामीण भागातील प्रत्येक घरी जाऊन प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून सुमारे 9 लाख मतदारांचे मतदानाविषयी समुपदेशन केले. याशिवाय उमेद टीमने मतदानादिवशी ही आपली जबाबदारी 100 % बजावताना , वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक व्यक्ती मतदार केंद्रापर्यंत जाऊन प्रत्यक्ष मतदान कसे करेल यासाठी नियोजन केले. कोणाचे मतदान झाले कोणाचे मतदान होणे बाकी आहे याची माहिती घेत ज्यांचे मतदान राहिले आहे त्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्याचे काम केले.
सातारा जिल्ह्यामध्ये गत पंचवार्षिक मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतील टक्का वाढवण्यासाठी विकास प्रशासनाच्या कुटुंबप्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी केलेल्या अवाहानास उमेद टीमने प्रतिसाद देत मतदानाचा टक्का वाढवून दाखविला.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!