Thu, Jan 15, 2026
सहकार

किसन वीर व खंडाळ्याचे ऊस बील जमा १६ कोटी ७६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग

किसन वीर व खंडाळ्याचे ऊस बील जमा १६ कोटी ७६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग
Ashok Ithape
  • PublishedMay 13, 2024

वाई l  दि. १३ : किसन वीर व खंडाळा कारखान्याकडे १ ते १५ डिसेंबरपर्यंत गळितास आलेल्या ऊसाच्या बीलाची रक्कम प्रति मेट्रिक टन ३ हजार रूपयांप्रमाणे १६ कोटी ७६ लाख ८१२ एवढी रक्कम संबंधित ऊस उत्पादक सभासद व बिगर सभासदांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती किसन वीर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी माहितीप्रत्रकाद्वारे दिली.

माहितीप्रत्रकात पुढे म्हटले आहे की, कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील यांनी सुतोवाच केल्याप्रमाणे नुकतीच नोव्हेंबर महिन्याची बीलेही आपण शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेली आहेत. आज (दि. १३) डिसेंबरमध्ये १ ते १५ या कालावधीत गाळपास आलेल्या ऊसाचे बील १६ कोटी ७६ लाख ८१२ रूपये ऊस उत्पादकांच्या खात्यावर वर्ग केलेले आहेत.

साखरेच्या भावामध्ये चढ-उतार तसेच साखरेस उठाव नसल्याने आपल्या संचालक मंडळास बीले देण्यास विलंब होत आहे. उर्वरित पंधरवड्यांची बीलेही लवकरात लवकर जमा करणार असून सभासदांनी आतपर्यंत जो संयम व विश्वास संचालक मंडळावर दाखविला आहे, त्याबद्दल संचालक मंडळाच्यावतीने आभारही श्री. शिंदे यांनी मानले आहेत.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!