राज्यस्तरीय काव्यसंमेलनात एकास एक वरचढ कवितांचा सादर झाला नजराणा
![]()
मुक्त व्यासपीठामुळे लहान थोरांना मिळाले हक्काचे व्यासपीठ
चिंधवली l दिपक पवार
मनात आलेलं ओठांतून कागदावर उतरलं तर मन मोकळं होत, हलकं होतं त्यातून दर्जेदार विचारांची पेरणी परिपक्व होत जाते आणि परिपक्व झालेले कायमचं सर्वांसाठी उर्जावान बनते असचं काहीसं घडलं, घडवलं ते सातारच्या काव्यमनांनी आणि त्याला खरी ताकद दिली ती सातारा मराठी साहित्य मंडळाने.
सातारा येथे राज्यस्तरीय मराठी साहित्य मंडळ शाखा सातारा शहर यांच्या विशेष प्रयत्नातून काव्य संमेलन भरविण्यात आले होते, काव्यमनांच्या कवितांना ताकद देण्यासाठी संयोजकांनी केलेले नियोजन कार्यक्रमाला शोभा वाढवण्याइतपत सुंदर आणि मान्यवरांच्या उपस्थितीत मिळालेला पाठिंबा भरारी घेण्याइतपत भारदस्तच आणि त्यात रसिक स्त्रोत्यांनी दिलेली दाद कार्यक्रमाचा आलेख चढता ठेवणाराच…
आकर्षक सप्तरंगांनी उमटलेली रांगोळी, सरस्वती पूजन आणि मान्यवरांच्या हस्ते झालेले दिपप्रज्वलन आणि कवी, कवयीत्री यांच्या बरोबर स्त्रोत्यांच्या उपस्थित कार्यक्रमाची सुरुवात झाली.
उपस्थित मान्यवरांची ओळख करून देत अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन केलेले स्वागत त्यातून आयोजकांच्या नियोजन बद्ध कार्यक्रम पत्रिकेनुसार काव्य संमेलनाची सुरुवात अगदी थाटात झाली, सर्वांना फेटे बांधून सन्मानित केले, सौ निलम मोहिते यांनी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी दैवत कवितेतून केलेली सुरवात ते दिदीने मनामनावर मोहीनी घातलेल्या बासरी वादनात काव्यमनांचे प्रमाणपत्र देऊन मान्यवरांनी केलेला गौरव, अध्यक्षांनी सर्वांना संबोधित केले तसेच मान्यवरांनी सर्वांना योग्य प्रकारे केलेले मार्गदर्शन आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राबलेले हात म्हणूनच राज्यस्तरीय काव्यसंमेलन उत्कृष्ट पद्धतीने पार पडले…
मा डॉ नलिनी महाडिक, मा डॉ भरत जाधव, सौ हेमा जाधव, श्री विश्वास नेरकर, श्री हनुमंत चांदगुडे, श्री विनायकराव जाधव, सौ उज्वला कुलकर्णी, सौ निलम मोहिते, श्री सुनील शेडगे, श्री सत्यनारायण शेडगे, जयमाला चव्हाण, श्री सुरेश जाधव, श्री विजय कदम, श्री जाधव सर, सौ वैशाली महाडिक, सौ वसुंधरा निकम, सौ संगिता साळुंखे, श्री कुंडलिक जगदाळे, श्री प्रविण घाडगे, श्री प्रल्हाद पार्टे शाखेचे सर्व सदस्य उपस्थितीत संमेलन सोहळा संपन्न झाला.













