Thu, Jan 15, 2026
तरुणांचा कट्टा प्रशासन

आकाशने घातली आकाशाला गवसणी सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा झाला IFS अधिकारी

आकाशने घातली आकाशाला गवसणी सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा झाला IFS अधिकारी
Ashok Ithape
  • PublishedMay 11, 2024

भुईंज :- महेंद्रआबा जाधवराव

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसचा (IFS) निकाल आज जाहीर झाला आहे. त्यात विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा विद्यार्थी आकाश कदम याने ऑल इंडिया रैंक ७६ मिळवून बाजी मारली आहे.

सातारा तालुक्यातील वेळे कामथी गावचा सुपुत्र आकाश हा कोल्हापूर येथील विद्या प्रबोधिनीतर्फे देण्यात येणाऱ्या चंद्रकांत पाटील स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्तीचा विद्यार्थी आहे.
त्याने युपीएससीने घेतलेल्या इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे. भारतीय वन सेवा ही आयएएस व आयपीएससारखी ऑल इंडिया सर्व्हिस असून, भारतातील वन संरक्षण आणि संवर्धन, वन कायद्यांच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाची सेवा मानली जाते.

वेळे कामथी ता. जि.सातारा येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील अशोक कदम व प्रा.आ.केंद्र लिंब येथे आरोग्य सेविका पदावर कार्यरत असलेल्या सौ. सुष्मा कदम यांचा सुपुत्र आकाश कदम याने अतिशय अवघड असणाऱ्या (UPSC ) संघ लोकसेवा आयोग २०२३ च्या IFS इंडियन फॉरेस्ट ऑफीसर या पदाला पहिल्याच प्रयत्नात आकाशने आकाशाला गवसणी घातली आहे.

कष्ट, जिद्द, ध्येय व चिकाटीच्या जोरावर आकाश सुपर क्लास वन अधिकारी झाला याचा सार्थ अभिमान कदम कुटुंबाला आहे. नगर विकास मंत्रालयात प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेली आकाशची मोठी बहीण कु. कावेरी हिची मिळालेली मोलाची साथ व ध्येय गाठण्यासाठी दिलेली हाक
ख-या अर्थाने सार्थ झालीय.

आज्जीने लहानपणी दिलेली शिकवण व मोठ्या बहिणीचे मार्गदर्शन तसेच आई-वडिलांनी दिलेले चाकोरीबद्ध शिक्षण यामुळेच उत्तुंग यशाला गवसणी घालता आल्याची प्रतिक्रिया आकाशने व्यक्त केली आहे.

आकाश अशोक कदम याने मिळवलेल्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!