Thu, Jan 15, 2026
कलाकार कट्टा

आर्ट इन मुव्हजतर्फे साताऱ्यात आजपासून महिलांसाठी नृत्य कार्यशाळा

आर्ट इन मुव्हजतर्फे साताऱ्यात आजपासून महिलांसाठी नृत्य कार्यशाळा
Ashok Ithape
  • PublishedMay 9, 2024

सातारा, ता.१०:

येथील आर्ट इन मुव्हजतर्फे शुक्रवार, दि. १० मे पासून सलग पाच दिवस सर्व वयोगटातील महिलांसाठी नृत्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्वेता अवघडे यांनी दिली आहे.

पोवई नाक्यावरील सातारा दूध संघाच्या मल्टीपर्पज सांस्कृतिक हॉलमध्ये ही महिलांसाठीची नृत्य कार्यशाळा होणार आहे. त्यासाठी वयाची कोणतीही अट नसून सर्व वयोगटातील मुली व महिला या कार्यशाळेत सहभागी होऊ शकतात. लावणी (बॉली लावणी) व हीप पॉप या नृत्य प्रकारांचे महिलांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येणार असून या प्रशिक्षणातून कलेची आवड जोपासण्याबरोबरच शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठीही मार्गदर्शन मिळणार आहे. या कार्यशाळेत प्रसिध्द नृत्य प्रशिक्षिका पूर्वा कोल्हे आणि हिमानी मेस्त्री यांच्यासह अंजली गायकवाड,श्वेता अवघडे या नृत्य क्षेत्रातील तज्ञ कलावंत मार्गदर्शन करणार आहेत.

सातारमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची नृत्य कार्यशाळा होत असून या कार्यशाळेत जास्तीत जास्त तरुणींनी व महिलांनी सहभागी होऊन त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आर्ट इन मुव्हजच्या संचालिका अंजली गायकवाड व श्वेता अवघडे यांनी केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!