Thu, Jan 15, 2026
शिक्षण

दिशा अकॅडमीचे पन्नास टक्के विद्यार्थी जेईई ॲडव्हान्ससाठी पात्र

दिशा अकॅडमीचे पन्नास टक्के विद्यार्थी जेईई ॲडव्हान्ससाठी पात्र
Ashok Ithape
  • PublishedApril 28, 2024

वाई l प्रतिनिधी:

इंजिनिअरिंग एन्ट्रन्स एक्झाम अर्थात जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून अथर्व चौधरी हा दिशा ॲकॅडमीत पहिल्या क्रमांकावर आहे. जेईई मेन परीक्षेसाठी दिशाचे ११९ विद्यार्थी बसले होते त्यापैकी ५१ विद्यार्थी जेईई ॲडव्हान्ससाठी पात्र ठरले आहेत.
देशभरातील सर्व परीक्षांर्थीचा निकाल हा पर्सेंटाइल मध्येच दिला जातो. यात अथर्वला सर्वाधिक ९९.५१ पर्सेंटाइल मिळाले आहे. दिशाच्या १८ विद्यार्थ्यांनी ९५ पेक्षा अधिक पर्सेंटाइल मिळवत उज्वल भविष्याकडे वाटचाल सुरू केली आहे. तर ३० विद्यार्थ्यांनी ९० पेक्षा अधिक पर्सेंटाइल मिळवले आहेत.

९५ पेक्षा अधिक पर्सेंटाइल मिळवलेल्या या १८ विद्यार्थ्यामध्ये दोन मुली तर सोळा मुलांचा समावेश आहे. त्यामध्ये आर्यन राज (९९.४२ पर्सेंटाइल), कौशल राज (९९.४२ पर्सेंटाइल), यजुवेंद्र रणावरे (९९.३६ पर्सेंटाइल), अथर्व अडसुळ (९८.६० पर्सेंटाइल), मृणाल भारती (९८.६० पर्सेंटाइल), यश निकम (९८.४३ पर्सेंटाइल), हर्ष राज (९८.२९ पर्सेंटाइल), यशराज साळुंखे (९८.१९ पर्सेंटाइल), सृजल सामंत (९७.९१ पर्सेंटाइल), श्रेयस कातुळे (९७.९१ पर्सेंटाइल), शंतनु मोरे (९७.८० पर्सेंटाइल), अमोद डेढे (९७.११ पर्सेंटाइल), अनुराग कुमार (९६.९८ पर्सेंटाइल), चैतन्य देशमुख (९६.७५ पर्सेंटाइल), सुमीत घोडे (९६.४३ पर्सेंटाइल), सौरभ कुमार (९५.१९ पर्सेंटाइल), वैष्णवी महांगडे (९५.०३ पर्सेंटाइल) यांचा समावेश आहे.

विद्यार्थ्याची मेहनत आणि शिक्षकांनी दिलेले योगदान हेच दिशाच्या घवघवीत यशाचे गमक असल्याचे सांगत दिशा ॲकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन कदम यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील शैक्षणिक प्रवासासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

———————————————————-

आमचे विद्यार्थी उत्तम शिक्षण संस्थेत प्रवेश मिळून भविष्यात यशस्वी प्रवास करतील असा व्यक्त करत प्रा. रूपाली कदम यांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले आहे.

दिशा ॲकॅडमीचे शैक्षणिक विभाग प्रमुख प्रा. सतीश मौर्य सर सर्व शिक्षक, कर्मचारी वृंद, पालक-विद्यार्थ्यांनी जेईई मेन परीक्षेच्या पहिल्या सत्रात घवघवीत यश मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. दिशाचे हे विद्यार्थी NITs, IIITs, GFTIs आणि इतर अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी JoSAA समुपदेशन प्रक्रियेत सामील होऊ शकणार आहेत.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!