Mon, Mar 2, 2026
स्थानिक बातम्या

पांडेवाडीच्या उपसरपंच पदी सुभाष चव्हाण यांची बिनविरोध निवड.

पांडेवाडीच्या उपसरपंच पदी सुभाष चव्हाण यांची बिनविरोध निवड.
Ashok Ithape
  • PublishedApril 20, 2024

भुईंज l प्रतिनिधी :

पांडेवाडी ता. वाई येथील ग्रामपंचायत उपसरपंच निवडीत एकच फॉर्म आल्याने सुभाष चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील डोंगर कुशीत बसलेले पांडेवाडी या गावी एकूण सात सदस्यांची ग्रामपंचायत असून एकीने राहणारी ग्रामपंचायत म्हणून पांडेवाडी ग्रामपंचायतीचा तालुक्यासह जिल्ह्यात नावलौकिक आहे.

या निवडी दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वाईच्या नायब तहसीलदार वैशाली जायगुडे-घोरपडे हजर होत्या.
त्यावेळी पांडेवाडीच्या ग्रामसेवक शुभांगी चव्हाण, पांडेवाडी गावचे सरपंच भाऊसाहेब फणसे, माजी उपसरपंच पंढरीनाथ दळवी, ग्रामपंचायत सदस्य सुंदराबाई मोहिते, सुजाता पिसाळ, शिल्पा चव्हाण, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.

नवनिर्वाचित उपसरपंच सुभाष चव्हाण यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्षेत्रातून, तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी शाल श्रीफळ पेढे भरवून शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना नवनिर्वाचित उपसरपंच सुभाष चव्हाण म्हणाले की पांडेवाडी गावाला शोभेल असे काम करून मिळालेल्या संधीचे माझ्यातून नक्कीच सोने होईल यातील मात्र शंका नसून गावच्या विकासासाठी मी बांधील असल्याची ग्वाही सुद्धां त्यांनी यावेळी दिली.

यावेळी माजी उपसभापती शंकरराव आप्पा शिंदे, निलेशशेठ देशमाने, उत्तम राजपुरे, विनोद साबळे, रवींद्र देशमाने, शंकर दळवी, संतोष मोहिते, अन्नपूर्णा कोल्हटकर, आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!