विजेच्या धक्याने वाई येथील पुरातन दत्तामंदिराच्या कळसाचा भाग कोसळला
वाई / प्रतिनिधीः
वाई शहरातील पुरातन मंदिरा पैकी साठे मंगल कार्यालया शेजारी असणार्या दत्त मंदिराच्या कळसाला कडकडाटाच्या वेगाने विज घासून गेल्याने त्याचा फटका बसल्याने पितळी कळस वाकडा झाला आहे तर कळसाला असणार्या कमळाच्या पाकळ्या या तुटुन पडल्याने कळसाचे नुकसान झाले आहे तर मंदिर पुजार्यांच्या घरातील सर्व इलेक्ट्रीक उपकरणे जळाल्याने ति बंद पडली आहेत. पण दत्त कृपा असल्याने जिवीत हाणी झाली नाही. अशी माहिती मंदिराचे मालक व पुजारी विवेक विद्याधर बापट यांनी दिली आहे.

विवेक बापट बोलताना पुढे म्हणाले, वाई शहरातील पुरातन मंदिरा पैकी दत्त मंदिर हे ३५० वर्षा पुर्वी बांधलेले आहे. या मंदिरावर पितळी कळस त्या काळी बसवलेला आहे. बुधवार दि. १७ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह ढगांचे गडगडा बरोबर वेगात वाहणार्यान सोबत पाऊसाला सुरवात झाली त्या वेळी याच दत्त मंदिराच्या कळसाला जोराच्या आवाजासह कळसावर असणाऱ्या पितळी कळसाला विज घासून गेल्याने पितळी कळस हा वाकडा झाला आहे. आणी कळसाचा रंग हा काळपट पडला आहे.
कळसाला चौफेर ३५० वर्षा पुर्वी पासुन असणाऱ्या कमळाच्या पाकळ्या या तुटुन पडल्याने कळसाचे पुर्वे कडील भागाचे फार मोठे नुकसान झाले आहे. अशी माहिती मंदिराचे मालक असलेले विवेक बापट यांनी दिली आहे. या मंदिराच्या कळसाची दुरुस्ती करण्या साठी दत्तभक्तांनी पुढाकार घेवुन आर्थिक मदत करावी असे आवाहनही बापट यांनी केले आहे













