Mon, Mar 2, 2026
राजकीय बातमीपत्र

मला उमेदवारी मिळणारच होती ; भाजपाचे उमेदवार श्री. छ. उदयनराजे भोसले यांची प्रतिक्रिया

मला उमेदवारी मिळणारच होती ; भाजपाचे उमेदवार श्री. छ. उदयनराजे भोसले यांची प्रतिक्रिया
Ashok Ithape
  • PublishedApril 16, 2024

सातारा / प्रतिनिधी –

“मला लोकसभेसाठी भाजपाची उमेदवारी मिळणारच होती, याबाबत माझ्या मनात कुठलीही शंका नव्हती, अशी प्रतिक्रिया श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा आज करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. श्री. छ. उदयनराजे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्मसमभाव ही संकल्पना राबवली. तोच विचार आम्ही पुढे नेत आहोत आणि लोकांची सेवा करत आहोत. तरुण, माता-भगिनींचं प्रेम यांची साथ मला मिळाली. मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की, मला उमेदवारी मिळणारच आहे. कोण काय बोलतं त्याकडे मी लक्ष देत नाही.

आत्ता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात जे सरकार केंद्रात सत्ता रूढ आहे, ते छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार राबवणारे व आचरणात आणणारे खऱ्या अर्थाने जनतेचे राज्य आहे. महाराष्ट्रात माझे मित्र आणि माजी मुख्यमंत्री, व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या विचारांचे आणि विकासाचा ध्यास धरणारे सरकार कार्यरत आहे असे सांगत राज्यातील सध्याच्या नेतृत्वाद्वारे चांगल्या प्रकारची विकासाची कामे महाराष्ट्रात झाली असं म्हणत उदयनराजेंनी महायुतीच्या सरकारचं कौतुक केलं आहे.

जेव्हा अस्थिर सरकार असतं तेव्हा प्रत्येकजण दबाव टाकत असतो. त्यामुळे निर्णय घेताना अडचणी येत असतात. केंद्रात आणि राज्यात खंबीर सरकार आहे. विकासकामं होत आहेत, झाली आहेत. लोकांना अपेक्षित असलेली त्यांची हिताची कामं या सगळ्यांकडून केली जातील असा मला विश्वास वाटतो, असंही उदयनराजेंनी यावेळी म्हटलं आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!