Mon, Mar 2, 2026
शिक्षण सातारा जिल्हा

प्राचार्य शिवाजीराव मोरे व शाळा सेवक दत्तात्रय मोहिते यांचा सेवानिवृत्ती सत्कार आ. श्रीमंत छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते संपन्न

प्राचार्य शिवाजीराव मोरे व शाळा सेवक दत्तात्रय मोहिते यांचा सेवानिवृत्ती सत्कार आ. श्रीमंत छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते संपन्न
Ashok Ithape
  • PublishedApril 14, 2024

भुईंज : महेंद्रआबा जाधवराव

अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर असलेल्या अजिंक्यतारा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिराचे प्राचार्य श्री शिवाजी दत्तू मोरे व शाळेचे सेवक श्री दत्तात्रय रघुनाथ मोहिते या दोघांचा सेवानिवृत्ती सत्कार आ. श्रीमंत छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

विद्यालयाचे प्राचार्य श्री शिवाजी दत्तू मोरे व व शाळेचे सेवक श्री दत्तात्रय रघुनाथ मोहिते हे दोघेही दिनांक 31 मे 2024 रोजी 28 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. याप्रसंगी बोलताना मा.आ. श्रीमंत छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले,तसेच त्यांनी शाळेच्या, संस्थेच्या व विद्यार्थी हितासाठी राबवलेल्या वेगवेगळ्या योजनांचे, शाळेची शिस्त, एसएससी,एचएससी, एन एम एम एस, शिष्यवृत्ती, मंथन,शासकीय रेखा कला परीक्षा, क्रीडा स्पर्धामध्ये गुणवत्ता वाढीसाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नाबद्दल कौतुक केले.

दोघांनाही त्यांच्या भावी आयुष्यात सुख,समाधान, व निरोगी दीर्घायुष्य लाभो अशा शुभकामना ही व्यक्त केल्या.

अजिंक्यतारा शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी मा.श्री जिवाजीराव मोहिते यांनीही प्राचार्य श्री मोरे व शाळा सेवक श्री मोहिते यांच्या कार्याचा गौरव केला. ज्येष्ठ शिक्षक श्री पांडुरंग कणसे यांनी प्रास्ताविक पर मनोगतात या कार्यक्रमाचे औचित्य विशद केले. या दोन सत्कारमूर्तींना प्रदान करण्यात आलेल्या सन्मानपत्राचे वाचन विद्यालयातील कलाशिक्षक श्री विवेक जाधव सर व विज्ञान शिक्षिका सौ सुदर्शना जगताप यांनी केले.

अजिंक्यतारा प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक श्री शंकर वसंत पवार व शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री संतोष मोरे यांनी या दोघांच्याही सेवेतील गुणवत्तापूर्ण बाबी, त्यांची वैशिष्ट्यपूर्ण कार्यशैली याप्रसंगी विशद केली. शाळेचे माजी विद्यार्थी डॉ श्री रणजीत मोरे यांनीही दोघांचा यथोचित कार्याच्या आठवणी सांगितल्या.या शाळेतील या दोन्ही सत्कारमूर्तींच्या योगदानाचे कौतुक केले.सत्काराला उत्तर देताना प्राचार्य श्री मोरे यांनी त्यांच्या सेवापूर्व व सेवाकाळातील संघर्षपूर्ण प्रसंगांचे वर्णन केले.

श्री दत्तात्रय मोहिते यांनीही आपल्या सेवापूर्व व सेवेतील काळात केलेल्या विविध वैशिष्ट्यपूर्ण कार्याचा उलगडा केला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा श्री यशवंत हरी साळुंखे,उपाध्यक्ष मा.श्री नामदेवराव सावंत, संस्थेचे सदस्य व माजी अध्यक्ष मा श्री रामभाऊ जगदाळे तसेच संस्थेचे माजी अध्यक्ष व सदस्य मा श्री सर्जेराव सावंत, संस्थेचे सदस्य मा श्री जयवंत कुंभार, कारखान्याचे सर्व संचालक , पदाधिकारी,दोन्हीही सत्कारमूर्तींचा मित्रपरिवार व नातेवाईक, पालक, विद्यार्थी मोठया संख्येने आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्येष्ठ शिक्षक श्री धनाजी जाधव, ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती जयश्री रानभरे मॅडम, कु शितल साळुंखे मॅडम,सौ नरे मॅडम श्री संभाजी मगर सर, सौ धनश्री शिंदे मॅडम,श्रीमती वैशाली पवार मॅडम , श्री विनोद कोळेकर सर, सौ वंदना बर्गे मॅडम , श्री अविनाश घाडगे सर ,श्री किरण बल्लाळ सर , कु रचना वानखेडे मॅडम, सौ सुरेखा कुंभार, सौ वर्षा क्षीरसागर, सौ तेजस्विनी पोतेकर मॅडम यांनी परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक श्री नेताजी ननावरे सर व श्री सतीश यादव सर यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री महेश जाधव सर यांनी केले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!