Mon, Mar 2, 2026
अभिष्टचिंतन

आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी विविध कार्यक्रम

आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी विविध कार्यक्रम
Ashok Ithape
  • PublishedMarch 29, 2024

भुईंज: महेंद्रआबा जाधवराव

सातारा- जावली मतदारसंघाचे आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा वाढदिवस शनिवार दि. ३० मार्च रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून त्यांच्या वाढदिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवारी सकाळी ८.३० वाजता आ. शिवेंद्रसिंहराजे चिमणपुरा पेठ येथील गारेचा गणपतीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर सकाळी ९ वाजता शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर स्व. भाऊसाहेब महाराज यांना अभिवादन करून आशीर्वाद घेणार आहेत तसेच भवानी मातेचे दर्शन घेणार आहेत. त्यांनतर सकाळी १०.३० वाजता गोडोली येथे आयोजित रौप्यमहोत्सवी रक्तदान शिबिराचे उद्घाटन, दुपारी १२ वाजता पोगरवाडी ता. सातारा येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन आदी कार्यक्रम होणार आहेत. याशिवाय एहसास मतिमंद मुलांचे वसतिगृह वळसे, मातोश्री वृद्धाश्रम खावली, आशाभवन (सकाळी व संध्याकाळी), आंनदाश्रम, रिमांड होम, बेगर्स होम, लक्ष्मीबाई पाटील मुलींचे वसतिगृह, कब्रस्थान मदरसा, स्नेह निकेतन मतिमंद मुलींचे बालगृह, दारुल उलूम हुसेनीया मोळाचा ओढा, शाहू बोर्डिंग धनणीची बाग, आर्यांग्ल हॉस्पिटल मधील रुग्ण आणि सिव्हिल हॉस्पिटलमधील रुग्ण (सकाळ आणि संध्याकाळ) यांना आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यावतीने मिष्ठान्न भोजन देण्यात येणार आहे.

सायंकाळी ६ ते ९ या कालावधीत आ. शिवेंद्रसिंहराजे कला वाणिज्य कॉलेजच्या मैदानावर (कोटेश्वर मैदानासमोर) जनतेच्या शुभेच्छांचा स्वीकार करणार आहेत. यावेळी सातारा आणि जावली तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, मान्यवर, कार्यकर्ते, शिवेंद्रसिंहराजेप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!