Mon, Mar 2, 2026
कृषी वार्ता

उरमोडी धरणाचे पाणी बंदिस्त पाईपलाईन मधून पोहचले खोडद बंधाऱ्यात !

उरमोडी धरणाचे पाणी बंदिस्त पाईपलाईन मधून पोहचले खोडद बंधाऱ्यात !
Ashok Ithape
  • PublishedMarch 27, 2024

भुईंज: महेंद्रआबा जाधवराव

उरमोडी धरणाचे पाणी सातारा तालुक्यालाही मिळाले पाहिजे ही तालुक्यातील जनभावना लक्षात घेऊन उरमोडी धरणाच्या उजवा कालव्यावर १० किलोमीटर खुला आणि उपळी येथून खोडद पर्यंत २२ किलोमीटर बंदिस्त पाईपलाईन करण्याचे काम मार्गी लावण्यासाठी भरीव निधी आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपलब्ध करून घेतला होता. या कालव्याचे (एकूण ३२ किलोमीटर) काम नुकतेच पूर्ण झाले आहे.

या पाइपलाईनमधून पाणी सोडून चाचणी घेण्यात आली. पाणी थेट खोडद बंधाऱ्यात पोहचले. या नवीन बंदिस्त पाईपलाईनमुळे तालुक्यातील पोगरवाडी, उपळी, शेळकेवाडी, शिवाजीनगर, वेचले, भाटमरळीचा काही भाग, पाडळी, नागठाणे, अतित आणि खोडद आदी भागातील शेतीसाठी उरमोडी धरणाचे पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे या भागातील सिंचनासाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागणीला न्याय देता आला याचे मनस्वी समाधान वाटल्याची कृतार्थ भावना आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केली.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!