भुईंज पोलिसांचे सुरुर येथे कोंबिंग ऑपरेशन
भुईंज : महेंद्रआबा जाधवराव
वाई तालुक्यातील सूरुर येथे अलीकडे मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारीच्या घटना घडलेल्या आहेत. लोकसभा निवडणूक आणि रमजान महिना या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अचानक गुरुवारी दुपारी कोंबिंग ऑपरेशन केले. भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या नेतृत्वाखाली हे कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले.
या ऑपरेशन मोहिमेमध्ये भुईंज पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार कर्मचारी होमगार्ड सहभागी झालेले होते. सुरूर येथील रेकॉर्ड वरील गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. कायदा व सुव्यवस्था राखावा असे आवाहन भुईंज पोलिसांच्या वतीने करण्यात आले. पवित्र रमजान महिना सुरू आहे तसेच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ही सुरू आहे या दोन्हीच्या पार्श्वभूमीवर वाई तालुक्यातील भूईज पोलीस ठाण्याच्यावतीने गुरुवारी दुपारी अचानक पणे कॉम्बिग ऑपरेशन राबवण्यात आले.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल, वाईचे डी वाय एस पी बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे हे कोंबिंग ऑपरेशन भुईंज पोलीस ठाण्याचे ए पी आय रमेश गर्जे यांनी राबवले. आज दि.21/03/2024 रोजी दुपारी 16.05 वा. ते 18.00 वा.चे दरम्यान लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 अनुषंगाने भुईंज पोलीस ठाणे हद्दीतील मौजे सुरुर येथील पारधी वस्ती येथे एरीया डॉमिनेशन व कोम्बिंग आँपरेशन राबविण्यात आले.
![]()
कोम्बिंग आँपरेशन दरम्यान भुईंज पोलीस ठाणे गु.र.नं.101/2018 IPC 382, 379, 34 मधील फरारी आरोपी नामे भानु मक्शा काळे,वय- 30 वर्षे, रा सुरुर , ता.वाई ही सदर ठिकाणी मिळुन आल्याने तिला सदर गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे. पारधी वस्ती सुरुर येथील एरीया डॉमिनेशन व कोम्बिंग संपलेनंतर विराटनगर झोपडपट्टी अमृतवाडी ता.वाई येथे एरीया डॉमिनेशन व कोम्बिंग आँपरेशन राबविण्यात आले. सदर ठिकाणी संशयित आरोपींचा शोध घेण्यात आला.
सदर एरीया डॉमिनेशन व कोम्बिंग आँपरेशन करीता भुईंज पोलीस ठाणेकडील 2 पोलीस अधिकारी, 17 पोलीस अंमलदार, 12 होमगार्ड तसेच BSF चे 2 अधिकारी व 18 कर्मचारी हजर होते.













