Mon, Mar 2, 2026
सातारा जिल्हा

आ.श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सुशोभीकरणातून मेढा शहराचा चेहरा मोहराच बदलला

आ.श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सुशोभीकरणातून मेढा शहराचा चेहरा मोहराच बदलला
Ashok Ithape
  • PublishedMarch 21, 2024

भुईंज: महेंद्रआबा जाधवराव

जावली तालुक्याची राजधानी असलेल्या मेढा शहराच्या सुशोभीकरणाकडे आमदार श्रीमंत छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लक्ष केंद्रित केले असून त्यांच्या प्रयत्नाने मेढा शहरात रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक व त्यामध्ये आकर्षक डिजाईनचे पथदिवे तसेच दुभाजकावर तटबंदीची डिझाईन करण्यात आली असून त्यावर शिवकालीन शस्त्र आणि वाद्य बसवण्यात आली आहेत त्यामुळे मेढा शहराला नवीन आकर्षक लूक मिळाला आहे. या सुशोभीकरणाने मेढा शहराला वैभव प्राप्त झाले असून मेढावासीय नागरिक आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आभार व्यक्त करत आहेत.

मेढा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रयत्नाने आणि त्यांनी मंजूर केलेल्या निधीतून मेढा शहरात बंदिस्त गटारे अंतर्गत रस्ते आदी कोट्यावधींची विकास कामे झाली असून मेढा शहरातून जाणाऱ्या सातारा महाबळेश्वर महामार्गावर रस्त्याच्या मध्यभागी असणाऱ्या दुभाजकावर शिवकालीन तटबंदीची डिझाईन तयार करण्यात आली असून या दुभाजकांमध्ये पथदिवे बसवण्यात आली आहेत हे पथदिवे नवीन पद्धतीचे व नवीन डिझाईनचे आकर्षक असून त्यामुळे मेढा शहराच्या वैभवात भर पडली आहे तसेच या दुभाजकावर शिवकालीन शस्त्र व संगीत वाद्य बसवण्यात आली आहेत. यामुळे मेढा शहराच्या सौंदर्यात भर पडली असून शहराला नवीन लुक प्राप्त झाला आहे.

मेढा शहराच्या विकासावर आणि सौंदर्यात वाढ व्हावी म्हणून आमदार शिवेंद्रसिंहराजे हे विशेष प्रयत्नशील असून लवकरच मेढा शहरात नाना नानी पार्क, मुलांसाठी खेळाची साधने, मोठा बगीचा व इतर अनेक विकास कामे होणार आहेत. मेढा शहराच्या विकास कामांवर आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी लक्ष केंद्रित केल्याबद्दल मेढा वासीयांनी त्यांचे आभार मानले आहेत.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!