विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्तेची स्पर्धा जिंकताना यशस्वी जीवनाचा मुलमंत्र आत्मसात करावा – गट विकास अधिकारी विजयकुमार परीट
भुईज l प्रतिनिधी :
विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्तेची स्पर्धा जिंकताना जीवनातील आव्हानात्मक स्पर्धानाहि सामोरे जावून यशस्वी जीवनाचा मुलमंत्र आत्मसात करावा तरच भविष्यातील संकटे पायदळी तुडवन्याचे सामर्थ्य निर्माण होऊन ख-या अर्थान शिक्षणाची व्याख्या पुर्ण होईल असे प्रतिपादन वाई पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी केले.
पाचवड ता. वाई येथे तिरंगा इंग्लीश मेडियम स्कूलच्या वतीने आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा व आदर्श माजी विद्यार्थी गौरव सोहळयात प्रमुख पाहुणे म्हणून वाईचे गट विकास अधिकारी विजयकुमार परीट बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे मार्गदर्शक पै. जयवंत पवार तर प्रमुख उपस्थितीत जेष्ठ निवेदक विठ्ठल माने, संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती पुष्पलता गायकवाड, प्रा. आर एस पाटील, पत्रकार जयवंत पिसाळ आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना वाई पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विजयकुमार परीट पुढे म्हणाले की, विद्यार्थी आणि स्पर्धात्मक परिस्थिती, पालकांच्या अपेक्षा यात अंतर पडून जीवन जगण्यासाठी लागणारे संस्कार व विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास शोधताना शिक्षकांचीहि कसरत होते. हे कुठेतरी थांबले पाहिजेत असे सांगून त्यांनी विविध घटना व कथा सांगत विद्यार्थ्यांना भविष्यासाठी मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्तेची स्पर्धा जिंकताना जीवनातील आव्हानात्मक स्पर्धानाहि सामोरे जावून यशस्वी जीवनाचा मुलमंत्र आत्मसात करावा तरच भविष्यातील संकटे पायदळी तुडवन्याचे सामर्थ्य निर्माण होऊन ख-या अथनि शिक्षणाची व्याख्या पुर्ण होईल असे सांगून त्यांनी संस्थेचे व शिक्षकांचे कौतुक केले.
प्रारंभी स्कुलचे माजी विद्यार्थी व नुकतीच महाराष्ट्र शासनात कृषी सहाय्यक निवड झालेले ऐश्वर्या गायकवाड, कर्गीस्तान येथे वैद्यकिय शिक्षण पुर्ण करणारे सफा मोमीन तर स्पोर्टमधून एम. वी.ए. पुर्ण करत प्रो कब्बडी व आय. सी. सी. स्पर्धाचे व्यवस्थापन करणारा मनजीत जाधव तसेच स्कुलचे शिक्षक प्रतिक बोराटे यांची मुंबई महानगर पालिकेत शिक्षक म्हणून निवड झाल्यावद्दल त्यांचा सत्कार सोहळा करण्यात आला.
प्रारंभी प्रास्ताविक संस्थेच्या मार्गदर्शिका सौ वनिता पवार यांनी केले स्वागत जयवंत पवार यांनी केले. आभार व निवेदन मुख्याध्यापिका वैशाली कुंभार यांनी केले.













