बावधन येथील भारताच्या रक्षणासाठी भरती जवानांचा सन्मान
बावधन / प्रतिनिधी : दि. 19
बावधन गाव शैक्षणिक दृष्ट्या व कर्तव्य भावनेतून झपाट्याने बदलत वाढत चालले आहे. गावातील सुशिक्षित मुले मुली उच्च पदावर विराजमान होताना दिसत आहेत. अलीकडच्या काळात लष्करात जाण्याचा युवकांचा कल वाढला आहे भारत मातेची सेवा करण्याची इच्छा प्रशासनात मोठ्या हुद्द्यावर तरुण-तरुणी शिक्षणाच्या जोरावर संधी पटकावत आहेत.
त्यांना प्रेरणा प्रोत्साहन देण्याच्या उदात्त हेतूने बावधन गाव तंटामुक्त समितीच्या वतीने अशा निवड नियुक्ती झालेल्यांचा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. येथील वरून राज, प्रताप पिसाळ यांची टेक्निकल इंडियन आर्मी मध्ये भरती झाल्याबद्दल त्याचा फेटा बांधून शाल श्रीफळ व पेढे भरउन सत्कार करण्यात आला.
श्रेयस अनिल जाधव हाही इंडियन टेक्निकल आर्मी मध्ये भरती झाल्याबद्दल फेटा बांधून शाल श्रीफळ व पेढे भरवून सत्कार करण्यात आला. तसेच बावधन मधील माधुरी तानाजी गुळदगड हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षेत प्रथम श्रेणीत येऊन एस आय टी सेल टॅक्स ऑफिसर म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल यांचाही सत्कार फेटा बांधून शाल श्रीफळ पेढे भरवून करण्यात आला.
गावातील सुशिक्षित युवकांना यापासून प्रेरणा प्रोत्साहन मिळावे हाच उदात्त हेतू या पाठीमागे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. आजकाल पोलीस भरती मिलिटरीत भरती साठी युवक मोठ्या संख्येने सहभाग घेत आहेत यासाठी आवश्यक शिक्षण, मेहनत, सराव करून आपल्या उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. विशेषता लष्करात जाऊन देशाची सेवा करण्याची जिद्द बाळगून युवक भरतीसाठी प्रयत्नांची पराकाष्टा करतात.
यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुनील तात्या कदम, ज्येष्ठ पत्रकार दिलीप कांबळे, नारायण शिंदे, सेल टॅक्स ऑफिसर माधुरी गुळदगड, यांनी आपली मनोगते व्यक्त केले. सत्कार समारंभ वेळी तंटामुक्त समितीचे सदस्य, सत्कार मूर्ती, पालक, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.













