Mon, Mar 2, 2026
अध्यात्म

ठोसेघर येथील श्री केदारनाथ यात्रेस प्रारंभ

ठोसेघर येथील श्री केदारनाथ यात्रेस प्रारंभ
Ashok Ithape
  • PublishedMarch 18, 2024

25 मार्च रोजी यात्रेचा मुख्य दिवस

सातारा / प्रतिनिधी –

ठोसेघर ता सातारा येथील ग्रामदैवत श्री केदारनाथ यात्रेस प्रारंभ झाला असून सोमवार दि. 25 रोजी यात्रेचा मुख्य दिवस आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ठोसेघर हा डोंगरदऱ्यामध्ये वसलेला प्रदेश असून नोकरी व्यवसाय निमित्त येथील रहिवासी साताऱ्यासह पुणे, मुंबई आदी ठिकाणी वास्तव्यास आहेत. यात्रेनिमित्ताने हे सर्व निवासी गावकरी आणि ग्रामस्थ एकत्रित येऊन ग्रामदैवताचा उत्सव साजरा करतात.

यात्रेनिमित्ताने विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. पालखी छबिना कुस्ती मैदान आदींसह भरगच्च कार्यक्रमांनी यात्रा संपन्न होते.

सोमवार, दि. 25 रोजी देवाला पहाटे पाच वाजता महाभिषेक घालण्यात येऊन यात्रेस प्रारंभ करण्यात येतो. यात्रेनिमित्ताने माहेरवाशींनी सुद्धा त्यांच्या परिवारासह माहेरच्या देवास येत असतात. बुधवार दिनांक 27 रोजी भव्य कुस्ती मैदान भरवण्यात येणार असून त्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यातून नामांकित मल्ल सहभागी होत असतात.

यात्रेतील विविध कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रविण जाधव, देवेंद्र चव्हाण, करण चव्हाण, आप्पी चव्हाण, कृष्णा चव्हाण, राजेश चव्हाण, धीरज काकडे, रोहित चव्हाण, धनराज चव्हाण, रोहन चव्हाण, आदित्य चव्हाण, प्रथमेश जानकर, समीर कदम हे मान्यवर व सर्वच ग्रामस्थ तसेच युवक कार्यकर्ते आणि विविध मंडळे विशेष परिश्रम घेत असतात सामूहिक योगदानातून पार पडणाऱ्या या यात्रेबद्दल भाविकांना मोठा आदर आहे

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!