सौ मीरा आडसुळ बेस्ट शाखा व्यवस्थापक पुरस्काराने सन्मानित
वाई दि.१८:-महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या अंतर्गत राज्यस्तरीय जागतिक महिला दिनानिमित्त सक्षम महिला सक्षम सहकार पुरस्कारांतर्गत बेस्ट शाखा व्यवस्थापक म्हणून कल्पतरू सहकारी पतसंस्था मर्यादित वाईच्या शाखा व्यवस्थापक सौ मीरा संजय आडसुळ यांना मा किरण दिलीप वळसे पाटील व सौ गौरी अतुल बेनके यांच्या शुभहस्ते पुरस्कार देण्यात आला.
कल्पतरु पतसंस्थेचे चेअरमन केशवराव पाडळे व त्यांचे सहकारी, अखिल भारतीय ग्राहक पंचायत वाई यांचे वतीने यशवंत लेले,सतीश जेबले,महसुल पुरवठा शाखेचे वतीने अतुल मर्ढेकर,संजय जायगुडे आदिनी त्यांचे अभिनंदन केले.













