Mon, Mar 2, 2026
महिला विशेष

प्राथमिक शिक्षक बँक शाखा महाबळेश्वरच्या वतीने महिला मेळावा संपन्न

प्राथमिक शिक्षक बँक शाखा महाबळेश्वरच्या वतीने महिला मेळावा संपन्न
Ashok Ithape
  • PublishedMarch 15, 2024

महाबळेश्वर – प्राथमिक शिक्षक सहकारी शिक्षक सहकारी बँक ली. सातारा ही महाराष्ट्र राज्यातील पगारदार नोकरांची अग्रगण्य बँक म्हणून ओळखली जाते. २०२४-२५ हे वर्ष बँकेचे शताब्दी महोत्सव वर्ष आहे. या शताब्दी महोत्सव निमित्ताने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला सभासद, यांच्यासाठो महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

महाबळेश्वर तालुक्यातील 83 महिला शिक्षिका या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. सौ. रेणुका ओंबळे कायदेतज्ञ अध्यक्ष म्हणून तर सौ स्वाती बंगडीया रोटरी क्लब प्रमुख पाहुण्या व महाबळेश्वर तालुका गटशिक्षणाधिकारी श्री आनंद पळसे साहेब उपस्थित होत्या.
शिक्षक बँकेचे चेअरमन श्री किरण यादव, संचालक श्री विजय ढमाळ, श्री नितिन फरांदे श्री संजय संकपाळ, व शाखाधिकारी विलास वाडकर उदघाटन प्रसंगी उपस्थित होते.

श्री विजय ढमाळ यांनी उपस्थित सर्व महिला यांना शुभेच्छा दिल्या. मा चेअरमन किरण यादव सर बँकेच्या विविध योजना सांगितल्या आणि महिला सभासद यांचे बँकेतील योगदानाबद्दल कौतुक केले. आदरणीय गटशिक्षणाधिकारी श्री आनंद पळसे यांनी महिलांना मान सन्मान मिळतो आहे. तो अधिक वाढविण्यासाठी जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि आपल्या कामातून आदर्श उभा केला पाहिजे याची जाणीव करून दिली.

स्वाती बांगडीया मॅडम यांनी आधुनिक काळातील महिला आणि तिची विचारसरणी यावर मत मांडताना महिलांनी आपल्या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहनत चिकाटी दाखवली पाहिजे. असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ रेणुका ओंबळे यांनी कायदेविषयक ज्ञान या विषयावर बोलताना महिलांना कोणत्या कायद्याविषयी ज्ञान असले पाहिजे या विषयी माहिती दिली. बँक कर्मचारी सौ प्रतिमा हिने बँकेच्या डिजिटल अँप ची माहिती दिली.

या कार्यक्रमाचे आयोजक श्री संजय संकपाळ संचालक शिक्षक बँक सातारा सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या. मोठ्या संख्येने उपस्थित दाखवली याबद्दल आभार व्यक्त केले.

महिला शिक्षिका यांनी महाबळेश्वर येथे पहिल्यांदा महिला मेळावा आयोजित करून सन्मान केला व एक हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिले म्हणून शिक्षक बँकेचे व संचालक संजय संकपाळ यांना धन्यवाद दिले.

या मेळाव्यात महिलांसाठी मनोरंजन खेळ घेण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रम व स्नेहभोजन यांचे आयोजन करण्यात आले होते.
मान्यवरांच्या उपस्थितीत उपस्थित सर्व महिलांचा सन्मान चिन्ह व गुलाब पुष्प देईन सन्मान करण्यात आला.

हा महिला मेळावा यशस्वी होण्यासाठी सौ वैशाली कदम, दीपाली ढेबे, रुपाली कारंडे, संगीता उतेकर, तसेच तालुक्यातील अन्य महिला शिक्षिका व बँक कर्मचारी आकाश जाधव, आशिष भिलारे यांनी मेहनत घेतली..
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता ढेबे यांनी केले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!