Mon, Mar 2, 2026
स्थानिक बातम्या

गुरे बाजार झोपडपट्टी रहिवासी संकुलातील विविध विकास योजनांचे भूमिपूजन संपन्न

गुरे बाजार झोपडपट्टी रहिवासी संकुलातील विविध विकास योजनांचे भूमिपूजन संपन्न
Ashok Ithape
  • PublishedMarch 14, 2024

वाई येथील गुरे बाजार झोपडपट्टी रहिवासी संकुलात गटारे, पाईपलाईन व चेंबर बांधकाम, गंगापुरी पाणवठा रस्ता, सिद्धनाथवाडी दशक्रिया विधी कट्टा आदी विविध विकास योजनांचे भूमिपूजन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीनकाका पाटील यांच्या हस्ते झाले.

वाई शहर, ता.१४:

पंचायत समितीचे माजी उपसभापती विक्रांत डोंगरे, माजी नगराध्यक्ष भूषण गायकवाड, भारत खामकर, राजेश गुरव, संजय चव्हाण, सुधीर खरात, मोहन जायगुडे, वामन खरात, जयवंत कचरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

आमदार मकरंद पाटील यांच्या प्रयत्नातून, सनी चव्हाण व सायली कट्टा मित्रपरिवाराच्या पाठपुराव्यातून ही कामे मंजूर करण्यात आली आहेत. पाणवठा रस्ता व दशक्रिया विधी कट्टयासाठी ८लाख१६ हजार, गुरे बाजार झोपडपट्टी रहिवासी संकुलातील नवीन गटारे,चेंबर व पाइपलाइन कामांसाठी१८ लाख९० हजार अशा २७ लाख ६ हजार रुपयांच्या कामांची सुरुवात करण्यात आली.

यावेळी नितीनकाका पाटील यांच्या लोकसभेच्या उमेदवारीची मागणी एकमुखाने करण्यात आली.

नितीनकाका पाटील म्हणाले, आमदार मकरंद पाटील यांनी गरज पाहून सर्व वंचित वस्त्यांमध्ये विकासाच्या योजना पोहोचविण्यासाठी जबाबदारीने पाठपुरावा केला आहे. वाई पालिकेच्या मुख्याधिकारी संजीवनी दळवी, किरणकुमार मोरे, अभियंता सचिन भधेंडे यांनी मंजुरीसाठी आवश्यक तांत्रिक सहाय्य केल्याचे सनी चव्हाण यांनी सांगितले.

उमेश जायगुडे, मोहन घाडगे, बापूराव खरात, हणमंत दुधाणे, शामराव खरात, उत्तम घाडगे, अवि मोरे,नितीन चौरे, विनोद चव्हाण, प्रसाद कचरे, राहुल जायगुडे, नारायण बरकडे, शंकर वाघ यांनी स्वागत केले.

यावेळी बंटी खरात, राजू कारळे, सुनील पवार, शिवाजी पवार, प्रसाद सुळके, मयूर खरात, शंकर नाना जायगुडे, दीपक जायगुडे, रमेश जायगुडे, युगल घाडगे, प्रकाश खरात, नामदेव चौधरी, मनोज सुळके, धनु खरात, लक्ष्मण खरात, विलास राजपुरे, नंदकुमार निकम, अक्षय घाडगे, महेंद्र ढगे, नितीन चौधरी, नागरिक व युवक उपस्थित होते

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!