Tue, Mar 3, 2026
अध्यात्म सातारा जिल्हा

सातारा जिल्ह्यातील ३२ मंदिरात वस्त्रसंहिता लागू

सातारा जिल्ह्यातील ३२ मंदिरात वस्त्रसंहिता लागू
Ashok Ithape
  • PublishedMarch 13, 2024

भुईंज: महेंद्रआबा जाधवराव

देशातील अनेक मंदिरे, गुरूद्वार, चर्च, मशिदच्या ठिकाणी वस्त्रसंहिता लागू आहे. त्यामुळे मंदिराचे पावित्र्य जपणे महत्वाचे असल्याने सातारा जिल्ह्यातीलही ३२ मंदिरात भारतीय संस्कृतीनुसार वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय विश्वस्तांनी घेतलेला आहे. तर महाराष्ट्रात ४५७ मंदिरात वस्त्रसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी दिली.

सातारा येथील समर्थ सदनमध्ये आयोजित पत्रकार परिषेत घनवट बोलत होते. यावेळी महासंघाचे जिल्हा निमंत्रक शिवाजीराव तुपे
ॲड.दत्तात्रय कुलकर्णी, गजानन भोसले, ॲड. दत्तात्रय सणस, रुपा महाडिक, हेमंत सोनवणे आदी उपस्थित होते.

वस्त्रसंहिता लागू सातारा जिल्ह्यातील मंदिरे..

सातारा शहर :
श्री दुर्गामाता मंदिर पंचपाळी हौद राजवाडा, श्री बहुलेश्वर मंदिर व्यंकटपुरा, श्री कृष्णेश्वर मंदिर, श्री अजिंक्य गणेश मंदिर राजवाडा, श्री महाकालिका मंदिर देवी चौक, श्री शनि मंदिर ५०१ पाटी, श्री प्रताप मारुती मंदिर प्रतापगंज पेठ, भैरवनाथ मंदिर करंजे, श्री कोटेश्वर मंदिर शुक्रवार पेठ, श्री मारुती मंदिर मेघदूत कॉलनी, श्री गणेश मंदिर आशीर्वाद कॉलनी संभाजीनगर आणि श्री विसावा मारुती मंदिर.

वाई तालुका :
श्री भद्रेश्वर शिव मंदिर. तर भुईंज येथील श्री महालक्ष्मी, श्री मारुती, श्री खंडोबा, श्री महादेव, महर्षी भृगू ऋषी समाधी मंदिर, श्री एकविरा माता, श्री भवानीमाता आणि श्री राम मंदिर तसेच जांब येथील श्री चिलाई देवी व श्री भैरवनाथ मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्यात आलेली आहे.

सातारा तालुका :
श्री चौंडेश्वरी माता मंदिर नागठाणे आणि श्री यवतेश्वर महादेव मंदिर.

कऱ्हाड तालुका :
श्री भैरवनाथ मंदिर मसूर. कऱ्हाड शहरातील श्री अंबामाता मंदिर, श्री हनुमान, श्री विठ्ठल, श्री राम आणि समर्थ स्थापित हनुमान मंदिर यांचा समावेश आहे.
खटाव तालुका श्री नाथ मंदिर

अशी असेल वस्त्रसंहिता..
• तोकडे कपडे घालून मंदिरात जाता येणार नाही

• मंदिरात फाटकी जीन्स वापरता येणार नाही

• अश्लील अन् अंग प्रदर्शन करणारी कपडे परिधान करणाऱ्यांना प्रवेश नसेल

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!