केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे 15 मार्च रोजी जागतिक ग्राहक अधिकार दिन आयोजित
सातारा, दि. 13 : जगभरात 15 मार्च हा दिवस जागतिक ग्राहक अधिकार दिवस म्हणून साजरा केला जातो या दिनाचे औचित्य साधून कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार आणि मध संचालनालय महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक15 मार्च जागतिक ग्राहक अधिकार दिवस साजरा करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे ठिकाण मध संचालनालय महाबळेश्वर येथे असून महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला यांचे प्रमुख मार्गदर्शन होणार आहे. महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील, भावेश कुमार जोशी ,उप कृषी विपणन सल्लागार , कृषी व विपणन संचालनालय , भारत सरकार,मुंबई यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

एगमार्क प्रमाणित उत्पादनांचे प्रदर्शन व तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांचे उत्पादन व विक्री या ठिकाणी होणार आहे. अन्न पदार्थातील भेसळ कशी ओळखावी याचे प्रात्यक्षिक दाखवली जाणार आहे. या कार्यक्रमांमध्ये दिग्विजय पाटील संचालक मध संचालनालय महाबळेश्वर हे मंडळाची मधमाशा पालन योजना याविषयी मार्गदर्शन करणार आहेत
मिलिंद जोशी शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र , बारामती, भूषण डेरे सी. ई .ओ.शेतकरी उत्पादक कंपनी ,वाई यांचे एगमार्क प्रमाणीकरण नियमावली व प्रक्रिया , शेतकरी उत्पादक कंपनीचे रजिस्ट्रेशन कसे व कोठे करावे व कोणकोणते फायदे आहेत यासाठी भारत सरकार काय मदत करते, कृषी उत्पादनांची निर्यात कार्य पद्धती , राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत विवीध योजना ,ग्राहकांचे हक्क या विषयावर मार्गदर्शन होणार आहे . हे प्रदर्शन सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.शेतकरी, मधुपालक, ग्राहक व्यापारी ,नागरिकांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन आयोकांनी केले आहे.













