बुद्धविहाराकडे जाणारा रस्ता हा विकास व शांतीचे प्रतीक
![]()
चांदवडी येथील भूमिपूजन कार्यक्रमात नितीनकाका पाटील यांचे प्रतिपादन
वाई / प्रतिनिधी : बुद्ध विहारास जोडणारा रस्ता हा विकासाबरोबरच सम्यक शांतीचे प्रतीक आहे. विविध जाती – धर्माच्या व्यक्तींना विकासकामांद्वारे जोडणे हा आमचा सामाजिक अजेंडा आहे. त्या दृष्टीने चांदवडीतील ग्रामस्थांसाठी सातत्याने विकासाचे पर्व घेऊन आम्ही सक्रिय आहोत असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन नितीनकाका पाटील यांनी केले आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत चांदवडी (ता. वाई ) येथील श्री भैरवनाथ वार्ड क्रमांक एक मध्ये आ. जननायक मकरंद पाटील (आबा) यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या बुद्ध विहाराकडे जाणाऱ्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.
किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे (दादा) यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
गेल्या अनेक वर्षांपासून चांदवडी गाव सातत्याने प्रगतीपथावर राहावे म्हणून आमच्या कुटुंबाने आणि नेतृत्वाने सातत्याने प्रयत्न केले आहेत. यापुढेही चांदवडीच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू, असेही नितीनकाका पाटील यांनी यावेळी सांगितले.
उपसरपंच रामदास पांडुरंग शिंदे यांनी प्रास्ताविकामध्ये परिसरातील विविध ग्रामस्थांच्या विचारांचा आढावा घेतला. तसेच ग्रामपंचायत सदस्य संतोष जनार्दन शिंदे यांनी समायोचित सूत्रसंचालन करून कार्यक्रमात चैतन्य निर्माण केले, तसेच चांदवडी परिसर सातत्याने जननायक आमदार मकरंदआबा यांच्या पाठीशी असून त्यामुळे येथील विकासकामांना नेहमीच बळ मिळते, असा अनुभव व्यक्त केला.

माजी सरपंच सुनील श्रीपती शिंदे यांनी आभार प्रदर्शनादरम्यान परिसरातील प्रगतीचा आणि एकंदरीत कार्यक्रमाचा आढावा घेतला व आमदारांचे सहकार्य व काकांनी दिलेले पाठबळ याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमास चांदवडी गावच्या सरपंच फरीदा अहमद शेख, यमुना सर्जेराव काकडे, ग्रामपंचायत सदस्या सौ. स्नेहल अमोल शिंदे, सौ. रेखा संतोष शिंदे, तसेच सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब मोरे, अमोल विठ्ठल शिंदे, नरेश सहदेव वाघ, राजेंद्र किसन शिंदे, प्रकाश पाटलू शिंदे, दत्तात्रेय बाळासाहेब पोळ, अनिल जाधव, विनोद जाधव, रफिक शेख, रमजान शेख, रितेश काकडे, विजय काकडे, सूरज ओंबळे, अनिकेत ओंबळे, मंदार काकडे, मच्छिंद्र पोळ तसेच चांदवडी व वेलंग येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.













