लो. टिळक स्मारक संस्था, व मकरंद पत्रकार प्रतिष्ठान संयुक्त विद्यमाने घरगुती वीज ग्राहकांसाठी “प्रधानमंत्री सूर्य घर-मोफत वीज” योजने विषयी मंगळवारी संवाद व माहिती चर्चासत्र..
भुईंज: महेंद्रआबा जाधवराव
वाई येथील लो. टिळक स्मारक संस्था, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं. लि., वाई विभाग, मकरंद पत्रकार प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ग्राहक दिनानिमित्त मंगळवारी (ता.१२) घरगुती वीज ग्राहकांसाठी ” प्रधानमंत्री सूर्य घर – मोफत वीज ” योजने विषयी संवाद व माहिती चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
लो.टिळक स्मारक संस्थेच्या रमेश गरवारे सभागृहात सायंकाळी ५ वाजता सदर कार्यक्रम होणार आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ.शंतनु अभ्यंकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात राज्य विद्युत वितरण कंपनीचे वाई विभागाचे कार्यकारी अभियंता अमित बोकील ” प्रधानमंत्री सूर्य घर – मोफत वीज ” योजने विषयी माहिती देणार आहेत.
यावेळी उपकार्यकारी अभियंता पंकज गोंजारी, शाखा अभियंता योगेश नायकवडी (वाई शहर २ ) इंजि. श्री. नानासाहेब कोळी ( वाई शहर १) प्रमुख उपस्थित राहणार आहेत. यावेळी टिळक ग्रंथालयाने उभारलेल्या सोलर सिस्टिमचे (6KW क्षमता) उद्घाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात विद्युत वितरण कंपनीचे अभियंता प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेची माहिती देणार आहेत, या कार्यक्रमास परिसरातील विज ग्राहकांनी उपस्थित रहावे असे आवाहन लो. टिळक स्मारक संस्थेचे उपाध्यक्ष दत्ता मर्ढेकर, कार्यवाह भद्रेश भाटे आणि मकरंद पत्रकार प्रतिष्ठानचे विवेक पटवर्धन यांनी केले आहे..













