Thu, Jan 15, 2026
स्थानिक बातम्या

भुईंजमध्ये तीन कोटींच्या विकासकामांचे लोकार्पन

भुईंजमध्ये तीन कोटींच्या विकासकामांचे लोकार्पन
Ashok Ithape
  • PublishedMarch 11, 2024

भृगुऋषी मठासाठी एक कोटी देणार – आमदार मकरंद पाटील

भुईंज : जननायक आमदार मकरंद पाटील यांच्या प्रयत्नातून व ग्रामपंचायतीचे उपसरपंच शुभम पवार आणि ग्रामपंचात सदस्य यांच्या पाठपुराव्यामुळे वॉर्डनिहाय तीन कोटी रुपयांची विकासकामंचे उद्घाटन करुन लोकार्पन करण्यात आले. यावेळी उर्वरित भृगुऋषी आश्रम (मठ) आणि मुस्लिम समाजाचे प्रार्थनास्थळाच्या तटबंदीसाठी दीड कोटींचा निधी देणार असल्याचे आमदार मकरंद पाटील यांनी जाहीर केले.

भुईज ता. वाई येथे फुलेनगर येथील ओढ्यावरील बंधा-यासाठी 28 लाख रुपये, भुईज ओझर्डे रस्त्यावरील भोसलेवस्ती येथील ओढ्यावरील बंधा-यासाठी 30 लाख, यासह अन्य दोन बंधा-यांना 57 लाख रुपये, भृगुऋषी चौक ते पोलिस ठाणे रस्ता 30 लाख, बदेवाडी येथील दत्तमंदीर सभा मंडप 12 लाख, भिरडाचीवाडी येथील रस्ता डांबरीकरण करणे 10 लाख, भिरडाचीवाडी अंगणवाडी इमारत बांधणी 10 लाख, खालचे चाहूर येथे जाधव वस्ती ते कारखाना रस्ता 4.50 लाख, वरचे चाहूर अंगणवाडी इमारत बांधकाम 11.25 लाख, वरचे चाहूर ओढ्यावरील बंधारा 25 लाख, खालचे चाहुर येथील रस्ता करणे 17 लाख, खालचे चाहुर जांभळी ओढ्यावरील पूल बांधणे 40 लाख, खालचे चाहूर पुढच्या ओढ्यावरील बंधारा बांधकाम 21 लाख यासह स्थानिक कार्यकर्त्याच्या सूचनेवरुन वाढीव कामाचे निर्णय घेत तीन कोट रुपयांची विकासकामंचे लोकार्पन करण्यात आले.

दरम्यान उपसरपंच शुभम पवार यांनी सुचवलेल्या कृष्णानदी काठावरील प्राचीन भृगुऋषी आश्रम परिसर विकासासाठी एक कोटी व मुस्लिम समाजाचे प्रार्थनास्थळ जामा मस्जिदच्या बाजूच्या असणा-या तटबंदीच्या बांधकामासाठी 50 लाख रुपये लवकरच देणार असल्याची ग्वाही देत उपसरपंच शुभम पवार व सदस्यांचे ग्रामपंचायत कामकाजाचे कौतुक केले. याही पुढे विकास कामासाठी लागेल एवढा निधी देण्याचा प्रयत्न राहिल असेही ते म्हणाले.

यावेळी कार्यक्रमास जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितिनकाका पाटील, किसनवीर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, पै,प्रकाश पावशे, कारखान्याचे संचालक रामदास इथापे, गजानन भोसले, प्रकाश धुरगुडे, संजय कांबळे, प्रकाश चव्हाण, निवास शिंदे, राजेंद्र सोनावणे, सुधिर गायकवाड, सुधीर भोसले, राजेंद्र भोसले, विनोद जाधव, सागर भितांडे, भरत भोसले, अमित लोंखडे, निशा भोसले, दिपाली भोसले, पूजा जांभळे, रुपाली खरे, कुमार बाबर, विजयराव इथापे, यांच्यासह भुईंज जिल्हा परिषद गटातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

– फोटो भुईज वरचे चाहूर येथे अंगणवाडी इमारत बांधकाम शुभारंभ करताना आमदार मकरंद पाटील, नितिनकाका पाटील, प्रमोद शिंदे, उपसरपंच शुभम पवार,राजू काका भोसले ,सुधिर भोसलेपाटील प्रकाश पावशे आदी.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!