Mon, Mar 2, 2026
महिला विशेष

आम्ही पुणेकर संस्थेतर्फे स्त्री शक्तीचा सन्मान

आम्ही पुणेकर संस्थेतर्फे स्त्री शक्तीचा सन्मान
Ashok Ithape
  • PublishedMarch 9, 2024

विविध क्षेत्रातील महिलांचा स्त्री शक्ती पुरस्काराने गौरव..

पुणे / प्रतिनिधी : जागतिक महिला दिन व महाशिवरात्रीनिमित्त आम्ही पुणेकर सामाजिक संस्था आणि जिजामाता पुरस्कार वितरण समिती यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला.

पुण्यातील नवी पेठेमधील पत्रकार भवनात आयोजित या
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ संस्कृत अभ्यासक पंडित वसंतराव गाडगिळ होते, तर प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले होते.

तेजस्विनी सेवेकरी, रुक्मिणी गलांडे, अर्चना देशमुख- कुलकर्णी, अपर्णा बासरकर, डॉ. दिशा वनारसे तसेच बीव्हीजी ग्रुप आपत्कालीन वैद्यकीय सेवा यांच्या प्रतिनिधींना यावेळी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आम्ही पुणेकर ही संस्था केवळ एक समूह नसून शिवछत्रपतींनी रायरेश्वरावर घेतलेली शपथ प्रत्यक्षात आणणारी व सामाजिक बांधिलकी जपणारी आदर्श संस्था आहे. भीमाशंकर भागातील आदिवासी समूह तसेच जम्मू काश्मीरमधील मुलींसाठी मोफत शैक्षणिक साहित्य व सायकलींचे वाटप करणारा उपक्रमही संस्थेने यापूर्वी राबवला होता. I. A.S. डॉक्टर सागर डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा येथील शिवस्मारकामध्येही संस्थेने यापूर्वी कार्यक्रम घेतला आहे.

संस्कृत भाषेमधील पहिले वृत्तपत्र सुरू करणारे ज्ञानवृद्ध व तेजस्वी व्यक्तिमत्व व शारदा ज्ञानपीठाचे संस्थापक पंडित वसंतराव गाडगीळ यांनी यावेळी समायोचित भाषण केले, तसेच मेघराज राजेभोसले यांनीही महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांच्या भाषणात महिलांचे कौतुक केले.

पुरस्कार प्राप्त महिलांनीही या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी विविध मान्यवरांची भाषणे झाली. सौ सोनिया इथापे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!