Mon, Mar 2, 2026
साहित्य

अमृतवेल वाचन चळवळीतील परमोच्च बिंदू!!

अमृतवेल वाचन चळवळीतील परमोच्च बिंदू!!
Ashok Ithape
  • PublishedMarch 9, 2024

सांगली : अमृतवेल पुस्तक वाचन व आकलन स्पर्धेतील दुसऱ्या पर्वाला सुरूवात झाली आहे. याअंतर्गत आदर्श महाविद्यालय विटा येथे कार्यक्रम झाला.

शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि डाॅ. डी. वाय. पाटील विद्यापीठ पिंपरीचे विद्यमान कुलगुरू डॉ. एन. जे. पवार सर यांचे मार्गदर्शन लाभले.

बुद्धीचे सामर्थ्य आणि त्यासाठी आवश्यक असलेले वाचन यासंदर्भात अप्रतिम, विचारप्रवण करणारे, प्रेरणादायक मार्गदर्शन पवार सरांनी केले.

अमृतवेलच्या वाचन चळवळीतील एक परमोच्च बिंदू आजच्या कार्यक्रमातून आणि पवार सरांच्या मार्गदर्शनातून झाला…

कार्यक्रमाचे नियोजन व संयोजनात महाविद्यालयाचे संस्थापक आदरणीय सदाशिवराव (भाऊ) पाटील, अध्यक्ष वैभवदादा पाटील, माजी प्राचार्य भाऊसाहेब कोरे, विद्यमान प्राचार्य निवास वरेकर, मराठी विभाग प्रमुख प्रा. मानसी जगदाळे यांनी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले…

नवी पिढी वाचती आणि विचारप्रवण बनवण्यासाठीच्या प्रवासातील हा एक माईलस्टोन…

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!